iPhone 15 : आता iPhone 15 तयार होणार भारतात ; आयफोन 14 पेक्षा स्वस्त दरात मिळणार?

आता अॅपल त्यांच्या अपकमिंग iPhone 15 मॉडलची निर्मिती भारतात करणार
iPhone 15
iPhone 15esakal

iPhone 15 : मोबाईल फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील आघाडीचा ब्रॅण्ड असलेल्या अॅपलने भारतात लवकर रिटेल स्टोअर सुरु करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता अॅपल त्यांच्या अपकमिंग iPhone 15 मॉडलची निर्मिती भारतात करणार असल्याच समोर आले आहे.

iPhone 15
Technology Tips : फक्त 2999 रुपये भरून घ्या Samsung Galaxy M53, फोनमध्ये मिळेल 108MP कॅमेरा

याआधी भारतात अॅपलकडून iPhones आणि AirPods तयार केले जात होते. अॅपल आता डिव्हाईसच्या लॉन्चच्या वेळी भारतात iPhone 15 मॉडेल शिप करण्याच्या तयारी करत आहे. आणि विशेष म्हणजे अॅपल हे पहिल्यांदाच करणार आहे. पण अॅपलच्या या निर्णयामुळे भारतीय युझर्ससाठी आयफोन 15 च्या किमती कमी होतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

iPhone 15
IPL 2023 Livestream : विना अडथळा मॅच बघण्यासाठी असा वाढवा WiFi चा स्पीड

तर अॅपलने भारतात त्यांचे प्रॉडक्शन वाढवायला हळूहळू सुरुवात केली आहे. आयफोन तयार करण्यासाठी अॅपल चीनवर अवलंबून होता. पण अॅपलला आता चीनमधील उत्पादन पूर्णपणे कमी करायचं आहे.

iPhone 15
Poco C51 : पोकोचा नवीन स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या Poco C51 च्या फीचर्सबद्दल

अशातच अॅपलने देशातील लोकल सप्लायर्सची मदतही घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये लोकल सप्लायर्स ही असणार आहेत. यांच्या माध्यमातून अॅपल कंपनीने भारतात iPhone 15 मॉडेलच्या मॅन्युफॅक्चुरिंगला सुरुवात केली आहे.

iPhone 15
World Health Day 2023 : असं करा स्वतःवर प्रेम अन् घ्या स्वतःची काळजी

दुसरीकडे iPhone 15 प्लस, iPhone 15 प्रो, iPhone 15 प्रो मॅक्स यासह इतर मॉडेल्सचे प्रॉडक्शन फक्त चीनमध्येच केले जाणार आहे. तसेच भविष्यात कंपनीने अॅपल पेन्सिलची निर्मिती करण्याची तयारी करत आहे. सध्या भारतातील पहिले अॅपल रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसी इथे ओपन होणार असल्याचे समजतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com