
पासवर्ड लक्षात राहत नाही! नो टेन्शन; आलं नवं फीचर
आपण अनेक प्रकारचे ॲप्स वापरत असतो. ॲप्सच्या सुरक्षितेसाठी आपण पासवर्ड ठेवत असतो.मात्र प्रत्येकाचे पासवर्ड लक्षात ठेवणे आपल्याला कधीकधी खूप कठीण जाते. जेव्हा आर्थिक व्यव्हाराचा प्रश्न येतो तेव्हा Google Pay, Phone Pay, Bhim, Patym सारखे ॲप्स वापरताना सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे. यात प्रत्येकाचा पासवर्ड लक्षात ठेवणे थोडे कठीण जाते. मात्र आता आपण गुगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्व अकाउंटला पासवर्डशिवाय लॉग इन करू शकणार आहोत. याविषयी जाणून घ्या. (now we can log in to google apple and microsoft accounts and its services without a password)
तुम्ही पासवर्डशिवाय लॉग इन कसे करू शकता?
जगातील तीन आघाडीच्या टेक कंपन्या, गुगल ,ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी एकत्रितपणे घोषणा केली आहे की ते एक अशी सेवा घेऊन येत आहेत ज्यामुळे युजर्सला त्यांच्या खात्यांमध्ये पासवर्डशिवाय लॉग इन करता येईल.
जाणून घ्या या नवीन सेवेमुळे कोणता फायदा युजर्सला मिळेल?
प्रत्येक डिव्हाइसचे युजर्स Google, Apple आणि Microsoft च्या या नवीन फिचर्सचा वापर करण्यास सक्षम असतील. अँड्रॉइड, आईओएस, क्रोम-ओएस, क्रोम ब्राउजर, एज, सफारी, मैक-ओएस या सर्व प्लॅटफॉर्मचे युजर्स या पासवर्डलेस फिचर्सचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. हे नवीन फीचर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, डेस्कटॉप, ब्राउझर डिव्हाईसवर सर्वत्र वापरू शकता.
हे फीचर कसे काम करेल ते जाणून घ्या
या टेक कंपन्यांचे म्हणणे आहे पासवर्डशिवाय युजर्स त्यांच्या अकाउंट सहजपणे लॉग इन करू शकतील तसेच त्यांचे स्मार्टफोन अनलॉक करू शकतील. जसे तुम्ही तुमचा फोन पिन, पासवर्ड किंवा पॅटर्नने अनलॉक करता, त्याचप्रमाणे तुम्ही आता तुमच्या ऑनलाइन अकाउंट लॉग इन करू शकाल.
हा विशेष कोड वापरावा लागेल
तुमच्या Google, Apple आणि Microsoft च्या अकाउंटमध्ये साइन इन करण्यासाठी, तुम्हाला क्रिप्टोग्राफिक टोकन (Cryptographic Token) किंवा FIDO(Fast ID Online) क्रेडेन्शियल वापरावे लागेल. अशा प्रकारे, तुम्ही पासवर्डशिवाय तुमचे अकाउंट लॉग इन करू शकणार.
हे फीचर तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याच्या त्रासापासून तर वाचवेलच, पण हॅकर्ससाठी असे लॉगिन आणि अकाउंट हॅक करणे अधिक कठीण होईल, म्हणजेच तुम्ही ऑनलाइन फसवणुकीपासूनही सुरक्षित राहाल.