

Nvidia Leadership Crisis Jensen Huang exits after reports of two alleged affairs
esakal
New York: जगातील आघाडीची एआय चिप निर्माता कंपनी एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेन्सेन हुआंग यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळातूनही ते बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी कोलेट क्रेस यांच्याकडे सीईओपदाची तात्पुर्ती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या घडामोडीमुळे जागतिक तंत्रज्ञान आणि एआय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.