Ola Battery Price : इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताय? बॅटरीची किंमत पाहून व्हाल हैराण, बिल व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ola Battery Price

Ola Battery Price : इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेताय? बॅटरीची किंमत पाहून व्हाल हैराण, बिल व्हायरल

Ola Battery Price Bill Viral : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाने अलीकडेच दुचाकी बाजारात प्रवेश केला आहे आणि अतिशय कमी कालावधीत कंपनीने आपल्या जबरदस्त स्कूटर श्रेणीसह बाजारपेठेत आघाडीचे स्थान काबीज केले आहे.

OLA इलेक्ट्रिक हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड बनला आहे. बाजारात हा ब्रँड अनेकवेळा चर्चेत राहिला आहे, कधी आगीच्या घटनांमुळे तर कधी स्कूटरच्या गुणवत्तेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता पुन्हा एकदा सोशल मिडीयावर या स्कूटरच्या बॅटरीची चर्चा होत आहे.

ट्विटरवर OLAच्या इलेक्ट्रिक स्कूटर बॅटरीची किंमत स्कूटरच्या किंमतीच्या निम्म्याहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकूण खर्चापैकी 40% ते 50% खर्च फक्त बॅटरीवर खर्च केला जातो.

OLA इलेक्ट्रिक बॅटरीची किंमत किती आहे?

OLA च्या बॅटरी पॅकचा फोटो शेअर करत ट्विटरवर एका यूजरने बॅटरीच्या किंमतीबद्दल सांगितले आहे, या पोस्टनुसार, OLA S1 च्या बॅटरी पॅकची किंमत 66,549 रुपये बॅटरीची किंमत सांगितली आहे.

यूजरने लिहिले की, "जर तुम्हाला सर्व बाबींमध्ये ICE वाहनांना मागे टाकायचे असेल, तर आम्ही Ola इलेक्ट्रिककडून चांगल्या ऑफर करण्याची आणि पाच वर्षांनंतर बॅटरीची किंमत कमी करण्याची अपेक्षा करतो."

Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर रेंजबद्दल बोलायचे झाले तर S1 Air ची किंमत 84,999 रुपये, S1 ची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,27,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक या स्कूटर्स कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकतात.