वनप्लस 11 लाँच होण्यापूर्वीच OnePlus 11R चे फोटो-स्पेसिफिकेशन्स लीक, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oneplus event on 17 december 2022 oneplus special phone oneplus 11 series might launch check details

वनप्लस 11 लाँच होण्यापूर्वीच OnePlus 11R चे फोटो-स्पेसिफिकेशन्स लीक, वाचा डिटेल्स

OnePlus चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 11 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 7 फेब्रुवारी 2022 रोजी भारतात नवीन OnePlus 11 लाँच करणार असल्याचे कंन्फर्म केले आहे. याशिवाय, वनप्लसचा आणखी एक प्रीमियम स्मार्टफोन लवकरच भारत आणि चीनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो अशी बातमी आहे.

OnePlus 11R स्मार्टफोन फ्लॅगशिप OnePlus 11 नंतर लगेच लॉन्च केला जाऊ शकतो. अनेक दिवसांपासून OnePlus 11R बद्दल सतत बातम्या येत आहेत. आता एका ताज्या लीकमध्ये हँडसेटचे लाइव्ह फोटो आणि नवीन डिटेल्स उघड झाले आहेत.

टिपस्टर योगेश ब्रार आणि गॅजेटगँग (GadgetGang) यांनी OnePlus 11R चे फोटो पोस्ट केले आहेत. नवीन लीकमुळे नवीन OnePlus फोनचे फ्रंट आणि बॅक पॅनल समोर आले आहेत. डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी प्रोटोटाइप केस दिसत आहे तसेच त्यांनी कॅमेरा मॉड्यूल उघड केले आहे.

हेही वाचा: Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला

OnePlus 11R चे डिटेल्स

टिपस्टरनुसार, OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले दिला जाईल . रिपोर्टमध्ये समोर आले आहे की फोनमधील डिस्प्लेवर मध्यभागी एक होल-पंच कटआउट दिला जाईल. स्क्रीन 1.5K रिझोल्यूशन ऑफर करेल. OnePlus 11R मध्ये Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिल्याचे बोलले जात आह. फोनला 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल. फोनमध्ये अलर्ट स्लाइडर आणि आयआर ब्लास्टरही देण्यात येणार असल्याचे ब्रार सांगतात.

हेही वाचा: २०२४ मध्ये राहुल गांधीच देणार मोदींना टक्कर; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोठे विधान

OnePlus 11R च्या लाइव्ह इमेजवरून समोर आले आहे की मागील पॅनलवरील कॅमेरा मॉड्यूलची रचना OnePlus 11 सारखीच असेल. टिपस्टरने उघड केले आहे की फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल जो ऑप्टिकल इमेज स्टॅबीलायजेशनला सपोर्ट देतो.

याआधीही OnePlus 11R शी संबंधित डिटेल्स समोर आले होते. फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले असेल. हँडसेटला 8GB आणि 16GB रॅम पर्यायासह 256 GB स्टोरेज पर्याय मिळेल.

हेही वाचा: Rishabh Pant Accident : पंतच्या अपघातानंतर विराट कोहलीचा खास संदेश, ट्विट करत म्हणाला...

OnePlus 11R स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. OnePlus चा हा नवीन फोन भारतात जवळपास 50000 रुपयांना लॉन्च केला जाऊ शकतो.

मागील OnePlus 10R चा 80W चार्जिंग व्हेरिएंट भारतात 38,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. तर 150W SuperVOOC चार्जिंग व्हेरिएंट 43,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला होता.

टॅग्स :OnePlus