OnePlus 12R : आजपासून होणार वनप्लस 12R स्मार्टफोनची विक्री; जाणून घ्या ऑफर्स, किंमत अन् फीचर्स..

केवळ वनप्लस इंडिया वेबसाईट आणि अमेझॉनवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
OnePlus 12R
OnePlus 12ReSakal

OnePlus 12R Offers : वनप्लसने काही दिवसांपूर्वीच आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. OnePlus 10R असं नाव असलेल्या या स्मार्टफोनची विक्री आज दुपारी बारा वाजेपासून सुरू होणार आहे. केवळ वनप्लस इंडिया वेबसाईट आणि अमेझॉनवरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

फीचर्स

OnePlus 12R या स्मार्टफोनमध्ये 6.78 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे. या फोनमध्ये 5,500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेअटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे. सोबत 8MP वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

किंमत

वनप्लस 12R स्मार्टफोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर, 16GB+256GB व्हेरियंटची किंमत 45,999 रुपये आहे. हा फोन कूल ब्लू आणि आयर्न ग्रे अशा दोन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 12R
Honor X9b : आता मोबाईल फुटणारच नाही? स्क्रीनमध्ये मिळणार चक्क 'एअरबॅग' टेक्नॉलॉजी, कधी होणार लाँच?

ऑफर्स

हा फोन खरेदी करण्यासाठी ICICI किंवा OneCard कार्ड वापरल्यास तात्काळ 1,000 रुपयांचा डिस्काउंट लागू होणार आहे. याव्यतिरिक्त जर तुम्ही जिओ यूजर असाल, तर 2,250 रुपयांपर्यंतचे जिओ प्लस बेनिफिट्स देखील तुम्हाला मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com