लवकरच येतोय OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन; पाहा डिटेल्स | OnePlus Foldable Phone | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OnePlus

लवकरच येतोय OnePlus चा फोल्डेबल स्मार्टफोन; पाहा डिटेल्स

स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हा फोन सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनपेक्षा वेगळा असणार आहे.आतापर्यंत बाजारात असे फोल्ड करता येतील असे बरेच स्मार्टफोन दाखल झाले आहेत, जे एकदाच फोल्ड केले जाऊ शकतात. वनप्लस कंपनी ट्राय-फोल्डेबल स्मार्टफोन घेऊन येत आहे. म्हणजेच वनप्लसचा हा फोन तीन वेळा फोल्ड केला जाऊ शकतो.

काय विशेष असेल

OnePlus च्या ट्राय-फोल्डेबल स्मार्टफोनला फोल्ड करण्यासाठी दोन हिंग्ज दिले जातील. जे अधिक सोप्या स्लाइडरने लॉक केले जाऊ शकते. अलीकडेच, OnePlus च्या फोल्डेबल स्मार्टफोनचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये तीन डिस्प्ले देण्यात आले आहेत. लीक झालेल्या रिपोर्टनुसार वनप्लसच्या ट्राय-फोल्डेबल स्मार्टफोनचे पेटंट 2020 मध्ये चीनमध्ये फाईल करण्यात आले होते. ते यावर्षी जुलै 2021 मध्ये पब्लिश केले गेले . OnePlus चे पेटंट जागतिक र्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिसकडे (WIPO) दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, हे डिव्हाईस तीन वेगवेगळ्या प्रकारे फोल्ड केला जाऊ शकतो. यामध्ये यूजर्सना संपूर्ण डिव्हाईसवर अॅप्लिकेशन डिव्हाईड करण्याचा ऑप्शन देण्यात येईल. तसेच, नवीन पेटंटमध्ये रोटेटींग टर्निंग प्लेटचा ऑप्शन देण्यात आला आहे, जो डिव्हाइसला ट्रॅंगल फोल्ड डिव्हाईड करतो.

हेही वाचा: तुम्हाला BH सीरीज रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

या फोनची सुरू आहे टेस्टींग

वनप्लस कंपनी OnePlus 8, OnePlus 8 Pro, OnePlus 8T च्या टेस्टिंगसाठी टेस्टरची नियुक्ती सुरू करण्यात आली आहे. कंपनी Android 12-बेस्ड Oxygen 12 beta वर काम करत आहे. लवकरच बीटा टेस्टिंग बंद केली जाईल, जेथे वापरकर्त्यांना नॉन-डिक्लोजर करार करावा लागेल. OnePlus 8T साठी सुमारे 200 लोकांना इनव्हाईट करण्यात आले आहे, तर OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro साठी 200 लोकांना इनव्हाईट करण्यात आले आहे. या सर्व सहभागींना OnePlus सह ADA (नॉन-डिस्क्लोजर करार) वर स्वाक्षरी करावी लागेल. कंपनी लवकरच OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus 8T Pro चा Opel बीटा प्रोग्राम सुरू करू शकते

हेही वाचा: 2021 Audi Q5 भारतात लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

loading image
go to top