तुम्हाला BH सीरीज रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस | BH Series Registration | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BH Series Registration

तुम्हाला BH सीरीज रजिस्ट्रेशन करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

BH Series Registration : भारत सरकारने नुकतीच वाहन नोंदणीसाठी 'BH सीरीज' लाँच केली आहे ज्यासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. या सीरिजची नंबर प्लेट असलेली गाडी तुम्ही देशात कुठेही चालवू शकता. या सिरीजच्या नंबर प्लेटचा थेट फायदा अशा लोकांना होणार आहे, ज्यांचे ट्रांसफर इतर राज्यात होत आहे. आता जर अशा लोकांना बीएस सीरीज क्रमांक रजिस्ट्रेशन एकदाच करावे लागेल, त्यानंतर त्यांना इतर राज्यांमध्ये तो बदलण्याची गरज नाही.

काय आहे 'BH सीरीज'

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'बीएच सीरीज' सुरू केली आहे, जेणेकरून नोकरी करणार्‍या कर्मचार्‍याची इतर कोणत्याही राज्यात बदली झाल्यास, तो नोंदणी न करता त्याचे सध्या चालवत असलेले दुचाकी किंवा चारचाकी वाहन दुसऱ्या राज्यात देखील वापरू शकतील. सध्या दुसऱ्या राज्यात बदली झाल्यास त्यांना प्रथम त्यांचे वाहन रजिस्ट्रेशन असलेल्या राज्यातून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घ्यावे लागते. मूळ राज्यातून एनओसी मिळाल्यानंतर, 12 महिन्यांच्या आत वाहनाचे नवीन राज्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. याशिवाय वाहन खरेदीच्या वेळी 15 वर्षांसाठी भरलेला रोड टॅक्स देखील वाहन मालकाने ज्या नवीन राज्यात ट्रांन्सफार केले आहे तेथे भरावा लागेल.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

'BH सीरीज' रजिस्ट्रेशनसाठी अर्ज कोण करू शकतो

नवीन BH सीरीज नंबर प्लेट प्रत्येकासाठी नाहीये. फक्त तेच लोक बीएच सीरीज रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करू शकतात, ज्यांची नोकरी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ट्रांसफर झाली आहे. उदाहरण; संरक्षण मंत्रालय, केंद्रीय विभाग आणि ती खाजगी किंवा निमशासकीय कार्यालये, लष्कराचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्या व्यतिरिक्त, ज्यांची कार्यालये देशाच्या किमान चार प्रांतात आहेत असे कर्मचारी त्यांच्या वाहनांची बीएच सीरिजमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. मात्र, बीएच सीरिजमध्ये वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक नाही. भारत सीरीज घेतल्यानंतर वाहन मालकाला दुसऱ्या राज्याचा नोंदणी क्रमांक घ्यावा लागणार नाही. खाजगी किंवा निमशासकीय नोकर्‍या करणार्‍यांना देशातील किमान 4 राज्यांमध्ये कार्यालये असणे बंधनकारक आहे. त्यानंतरच वाहन मालक BHS सीरीजसाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा: Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; काय असेल किंमत-स्पेसिफिकेशन्स?

अर्ज कसा करायचा

अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही बीएच सीरीजसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी, प्रथम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर लॉग इन करा. नवीन वाहन खरेदी करताना डीलरला वाहन मालकाच्या वतीने व्हॅन पोर्टलवर उपलब्ध फॉर्म 20 भरावा लागेल.

गाडीच्या किमतीवर भरावा लागेल रोड टॅक्स

10 लाखांपेक्षा कमी - 8% कर

10 ते 20 लाखांच्या किंमतीवर - 10 टक्के कर

20 लाखांपेक्षा जास्त किंमतीवर - 12 टक्के कर भरावा लागेल.

loading image
go to top