Online Photo Editing : भन्नाट! हे ऍप्स वापरून फोटो करा एडीट

आजच्या काळात मोबाईल फोटोग्राफीला जास्त महत्त्व
Online Photo Editing
Online Photo Editingesakal

Photo Editing Software : आजच्या काळात मोबाईल फोटोग्राफीला जास्त महत्त्व आहे. त्यामूळे कॅमेरा क्वालिटी किती आहे हे पाहूनच मोबाईल खरेदी केला जातो. विविध कंपन्याही मोबाईलमध्ये नवनवीन कॅमेरा फीचर्स देत आहेत. फोटो क्लिक करून तो एडीट न करता पोस्ट केला तर चुकल्यासारखं वाटते. त्यामूळे चांगल्या कॅमेऱ्यासोबत मोबाईलमध्ये एडीटींग ऍप्सही डाऊनलोड करावे लागतात.

Online Photo Editing
HCI Tech कडून गुंतवणुकदारांना दिवाळी भेट, प्रति शेअर 10 रुपयांचा अंतरिम डिव्हिडेंड

प्रत्येक जण मोबाईल वर फोटो काढून फोटो एडिटिंग अँप च्या मदतीने फोटो एडिट करून सोशल मीडिया किंवा स्वतःच्या कामासाठी उपयोग करतात. लॅपटॉप, कॉम्प्युटर पेक्षा स्मार्टफोन्स वर फोटो एडिटिंग करणे खूप सोपे व फायदेशीर आहे.

Online Photo Editing
Wrong Gmail Edit: तुमचाही मेल चुकीच्या मेल आयडीवर गेलाय? अशी सुधारा तुमची चूक

फोटो केवळ सोशल मिडीयावर पोस्ट करण्यासाठी नाही तर ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. काही खास फिचर असलेले ऍप्स मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करण्याचीही गरज नाही. ते ऑनलाईन एडीटही करता येतात. त्यामूळे असेच काही ऍप्स पाहूयात.

Online Photo Editing
Galaxy M32 Prime Edition: सॅमसंगने लॉन्च केला 20MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; किंमतही परवडेल

पिआयएक्सएलआर (Pixlr)

सॉफ्ट एडिटिंगसाठी Pixlr हा एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी तूम्हाला पैसे द्यावे लागत नाहीत. या अॅपमध्ये अशी अनेक टूल्स देखील आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग करू शकता. या अॅपद्वारे तुम्ही क्लोनिंग आणि कलर रिप्लेसमेंटही करू शकता. वापरायला सोपे आणि अगदी युजर फ्रेंडली आहे.

Online Photo Editing
Redmi K50 Extreme Edition : 108 मेगापिक्सेल कॅमरासह 'या' दिवशी होणार लॉन्च

फोटोर (Fotor)

हे फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर तुम्हाला फोटोवर बारकाईने काम करण्यास मदत करते. प्रोफेशनली काम करत असाल तरी तुम्ही या ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने चेहऱ्यावरील डाग, बारीक खड्डे घालवू शकता. त्यामूळे प्रोफोशनल कामासाठी हा चांगला पर्याय आहे.

Online Photo Editing
Online Loan App : लोन ॲपच्या गुन्ह्यांमध्ये दुप्पट वाढ

कॅनव्हा Canva

हे ऍप तूमच्या फोटोचे एका सुंदर पोर्ट्रेट चित्रात रूपांतर करते. कॅनव्हा हे सॉफ्टवेअर तुम्हाला इतर सॉफ्टवेअरपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा पर्याय देते. त्यावर तुम्ही डिझायनिंगही करू शकता. येथे तुम्ही शॉर्ट फोटो करू शकता तसेच टेक्स्ट आणि ग्राफिक्सचे आर्टही करू शकता. हे ऍप नव्या व्यक्तीसाठीही हाताळायला सोपे आहे.

Online Photo Editing
Online Loan App : ऑनलाईन लोन ॲपचे चायना कनेक्शन, १ महिन्यात ३५० पेक्षा जास्त तक्रारी

Befunky

हे सॉफ्टवेअर तुम्हाला फोटो एडिटिंग आणि टेक्स्ट ऍड करण्यासाठी सोपे आहे. यामध्ये अनेक फोटोचा कोलाज बनवता येतो. तो एडीटही करता येतो. यामध्ये ग्राफिक्सचेही काम करू शकता. तुम्ही सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करण्यासाठी फोटोही एडीट करू शकता.

Online Photo Editing
Nashik : Offline पद्धतीने स्वीकारली जाणार बिले; Online प्रणालीस महिन्याचा अवधी

Picmonkey

तुम्ही या फोटो एडीटींग वेबसाइटचा वापर भन्नाट फोटो एडीटींगसाठी करू शकता. यासाठी कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. तुम्हाला फोटोचे फिल्टर, साईज, क्रॉप करणे, कलर आणि एक्सपोजर एडीट करता येते. यावर तुम्ही सगळ्या फॉरमॅटमध्ये फोटो सेव्ह करू शकता. यामूळे फोटो कुठेही पाठवताना तो ब्लर होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com