
Oppo K13x 5G Mobile Details : मोबाईलच्या बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालणारी ओप्पो कंपनीने आपला नवा 5G स्मार्टफोन Oppo K13x भारतात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे, 6,000mAh ची जबरदस्त बॅटरी, 50MP कॅमेरा आणि दमदार MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसह येणारा हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपायांपासून उपलब्ध आहे
Oppo K13x ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामधील 6,000mAh क्षमतेची बॅटरी, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येते. ओप्पोच्या मते, एका चार्जमध्ये दीड दिवस सहज टिकते त्यामुळे प्रवास, गेमिंग आणि सतत मोबाईल वापरणाऱ्यांसाठी ही एक परफेक्ट निवड आहे.
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसरवर कार्य करतो, जो दैनंदिन वापर आणि मल्टीटास्किंगसाठी चांगला ठरतो. यामध्ये आहे
Mali-G57 MC2 GPU
4GB/6GB/8GB LPDDR4x RAM
128GB ते 256GB UFS 2.2 स्टोरेज, जे 1TB पर्यंत वाढवता येते
नवीनतम ColorOS 15 (Android 15) प्रणालीसह, 4 वर्ष OS अपडेट्स आणि 6 वर्ष सुरक्षेसाठी अपडेट्सची हमी देते
50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सरचा ड्युअल सेटअप मिळतो, जो 1080p व्हिडिओ 60fps पर्यंत शूट करू शकतो. 8MP फ्रंट कॅमेरा देखील 1080p 30fps वर सेल्फी व्हिडिओ शूट करू शकतो सोशल मीडिया यूजर्ससाठी उत्तम पर्याय
6.67-इंचाचा HD+ डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट
1,000 निट्स ब्राइटनेस
Panda Glass प्रोटेक्शन
IP65 वॉटर/डस्ट रेसिस्टंट
MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड ड्युराबिलिटी हे सगळे मिळणे या किमतीत अत्यंत दुर्मीळ आणि फायद्याच आहे
Oppo K13x भारतात ३ व्हेरियंट्समध्ये २७ जूनपासून Flipkart आणि Oppo च्या अधिकृत वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे
11,999 रुपये – 4GB RAM + 128GB
12,999 रुपये – 6GB RAM + 128GB
14,999 रुपये – 8GB RAM + 256GB
Midnight Violet
Sunset Peach
कमी बजेटमध्ये 5G, मोठी बॅटरी, चांगला कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि मजबूत डिझाइन शोधत असाल, तर Oppo K13x 5G हा स्मार्टफोन निश्चितच तुमच्यासाठी एक ‘वॅल्यू फॉर मनी’ पर्याय ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.