OnePlus : महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये मिळणार नाहीत वनप्लसचे फोन? काय आहे प्रकरण? जाणून घ्या

गेल्या कित्येक महिन्यांपासून ओआरएने वनप्लस कंपनीकडे काही प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत. मात्र, कंपनीने अजूनही त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नाही.
OnePlus Retail
OnePlus RetaileSakal

OnePlus Products in retail stores : वनप्लस कंपनीचे फोन आता दुकानात मिळणं बंद होण्याची शक्यता आहे. साउथ इंडिया ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशनने (ORA) याबाबत कंपनीने धमकी दिली आहे. याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमध्ये होणार आहे.

काय आहे कारण?

गेल्या कित्येक महिन्यांपासून ओआरएने वनप्लस कंपनीकडे काही प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत. मात्र, कंपनीने अजूनही त्यावर समाधानकारक उत्तर दिलं नाही. यामुळे आता वनप्लसच्या प्रॉडक्ट्सची ऑफलाईन विक्री बंद करू असा इशारा ORA ने कंपनीला पत्र लिहून दिला आहे. मनीकंट्रोलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

याबाबतचं पत्र ओआरएने वनप्लस टेक्नोलॉजी इंडियाचे विक्री प्रमुख रणजीत सिंह यांना लिहिलं आहे. गेल्या वर्षी वनप्लसच्या काही उत्पादनांच्या विक्रीबाबत रिटेलर्स असोसिएशनला काही अडचणी आल्या होत्या. याबाबत कंपनीला वारंवार बोलून देखील अडचणींचं समाधान मिळालं नाही. कंपनीने ORA ला दिलेली वचनं देखील पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे आमच्याकडे हे कठोर पाऊल उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असं या पत्रात म्हटलं आहे.

OnePlus Retail
Russia-Ukraine War: गुगल ट्रान्सलेटने सहा भारतीयांना रशियन युद्धातून बाहेर पडण्यास कशी केली मदत? नेमकं काय घडलं?

4,500 पेक्षा जास्त दुकानं

ORA ने म्हटलं आहे, की वनप्लसने समाधानकारक उत्तरं दिली नाहीत, तर 1 मे 2024 पासून कंपनीच्या सर्व प्रॉडक्ट्सची रिटेल विक्री बंद करण्यात येईल. हा निर्णय आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमधील 4,500 हून अधिक रिटेल स्टोअर्सना लागू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com