

Rising petrol and diesel prices are likely to push up mobile recharge costs
esakal
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता मोबाईल रिचार्ज आणि प्लॅन्स महाग होण्याची चर्चा जोरात आहे. देशभरात पेट्रोलची किंमत अनेक शहरांत १०७ रुपयांवर गेली आहे. यामुळे रोजच्या खर्चात वाढ झाली आहे. आता टेलिकॉम कंपन्याही रिचार्ज दर वाढवण्याचा विचार करत आहेत.