लाँचपूर्वीच Altoचे फोटो आले समोर; काय आहेत वैशिष्ट्य जाणून घ्या

मारुती सुझुकीची नेक्स्ट जनरेशन कार अल्टो (Alto) लवकरच लाँच होणार आहे.
Maruti Suzuki Alto
Maruti Suzuki AltoSakal

मारुती सुझुकी यावर्षी अनेक नवीन वाहने लॉन्च करणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने नवीन बलेनो आणि वॅगनआर फेसलिफ्ट मॉडेल सादर केले आहेत. आता एंट्री-लेव्हल हॅच नवीन अल्टो पुन्हा एकदा चाचणी दरम्यान दिल्लीच्या आसपास दृष्टीस पडली आहे. ही कार पूर्णपणे झाकलेली होती. मात्र, फोटो पाहता तिच्या बाह्य डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात आल्याचे दिसते. एकदा लॉन्च झाल्यानंतर, नवीन मारुती अल्टो डॅटसन रेडी-जीओ, रेनॉल्ट क्विड आणि मारुती एस-प्रेसो यांसारख्या एंट्री-लेव्हल हॅचबॅकशी स्पर्धा करेल.

याशिवाय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मारुती अल्टो 6 नवीन रंग पर्यायांसह ऑफर केली जाईल. ती मारुती सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल, जी आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक मजबूत आणि आरामदायी असेल. (Photos of the new Alto surfaced ahead of launch, see latest details)

Maruti Suzuki Alto
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी

पुढच्या पिढीतील मारुती अल्टो देखील सध्याच्या मॉडेलपेक्षा मोठी आणि अधिक प्रशस्त असेल, त्यामुळे लोकांना नवीन अल्टोमध्येही स्विफ्ट आणि वॅगनआरसारखा आराम मिळेल. याशिवाय मारुती सुझुकीने आजपासून 2022 नेक्स्ट-जेन एर्टिगाची बुकिंग सुरू केली आहे. आता हे वाहन लवकरच लॉन्च होणार आहे. ग्राहक 11,000 रुपये भरून नवीन Ertiga प्री-बुक करू शकतात. पुढील-जनरल एर्टिगा पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडली जाईल. तिच्यामध्ये उत्कृष्ट डिझाईन, उच्च मायलेज, नेक्स्ट-जेन एर्टिगा नवीन तंत्रज्ञान आणि नवीन वैशिष्ट्यांसह येईल.

Maruti Suzuki Alto
Maruti लवकरच लॉन्च करणार 'ही' नवीन कार; जाणून घ्या काय असेल खास

एर्टिगा कनेक्टेड कार तंत्रज्ञान - सुझुकी कनेक्ट आणि 17.78 सेमी (7-इंच) स्मार्टप्ले प्रो टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसह येईल. नेक्स्ट-जनरेशन Ertiga S-CNG आता ZXI प्रकारातही उपलब्ध असेल.

नेक्स्ट-जनरेशन Ertiga साठी बुकिंगची घोषणा करताना, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे ​​वरिष्ठ कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, “Ertiga 750,000 हून अधिक ग्राहकांसह भारताच्या MPV बाजारपेठेत एक गेम चेंजर ठरले आहे. शैली, जागा, तंत्रज्ञान, सुरक्षितता, आराम आणि एकत्र प्रवास करण्याची सोय यांची पुन्हा व्याख्या करणारी नेक्स्ट-जनरल एर्टिगा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com