esakal | इटलीच्या पियाजियो कंपनीनं भारतात लाँच केली नवीन टू-व्हीलर; जाणून घ्या फीचर्स

बोलून बातमी शोधा

इटलीच्या पियाजियो कंपनीनं भारतात लाँच केली नवीन टू-व्हीलर; जाणून घ्या फीचर्स
इटलीच्या पियाजियो कंपनीनं भारतात लाँच केली नवीन टू-व्हीलर; जाणून घ्या फीचर्स
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद : इटलीची वाहन निर्मिती कंपनी पियाजियोने भारतात त्यांची नवीन दुचाकी लॉंच केली आहे ज्याचं नाव Aprilla SXR 125 आहे. या स्कूटी लूक आणि डिजाइनच्या बाबतीत बराच प्रिमियम लुक देऊन जाते. या स्कूटीच्या लाँचिंगनंतर ती सुजुकी बर्गमॅन स्ट्रीट 125 ला टक्कर देईल असा तर्क केला जात आहे. या दोन्ही स्कूटींच्या किंमती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे इंजिन 125 सीसीचे आहे. चला तर जाणून घेऊया या दोन्ही गाड्यांबद्दल.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

1. Aprilla SXR 125:

या स्कूटीला 125 सीसीचे इंजिन आहे जे एअर कूल्ड टेक्नॉलॉजीवर चालते. हे इंजिन 9.4 बीएचपी पावर आणि 9.2 एनएमचे टॉर्क जनरेट करते. या गाडीला लक्सरी लूक देण्यासाठी कंपनीने अनेक फिचर ऍड केले आहेत ज्यामधे नवीन हेडलाईट, मोठी आणि आरामदायी सीट, मोबाईल कनेक्टिवीटीसाठी ब्लूटूथ, यूएसबी चार्जिंग पोर्टसारखे फिचर आहेत.

खराब रस्त्यांवरही चांगली राइड होऊ शकते असे याचे डिजायन आहे. यात एडजस्ट होणारे रियर सस्पेंशन तसेच सीबीएस आणि डिस्क ब्रेकही आहेत. तसेच या स्कूटीत 7 लिटर पेट्रोलची टाकीही आहे. किंमतीचा विचार केला तर या गाडीची रेंज 1 लाख 14 हजारांपासून होते.

Suzuki Burgman Street 125:

ही भारतातील पहिली अशी स्कूटी आहे ज्यात पहिल्यांदा डिजिटल इंस्टूमेंड कंसोल केलं आहे. चालकाच्या आरामदायी प्रवासासाठी कंपनीने मोठे आरामदायी सीट तयार केले आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्ये दोन्ही ठिकाणी एलईडीचा उपयोग केला आहे. फोन चार्जिंग आणि यूएसबी पोर्टची सोयही आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो, दीक्षाभूमीवर ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू; बाह्यरुग्ण विभागाला प्रारंभ

या स्कूटीला 124.3 सीसीचे इंजिन आणि 4 स्ट्रोकचे इंजिन दिले आहे जे एअर कुल्ड टेक्नॉलॉजीवर चालते. तसेच इंजिन 8.6 बीएचपी पावर आणि 10.2 एनएम टॉर्क जनरेट करते. 5.6 लिटरची पेट्रोल टाकी असून याची किंमत 95 हजारांपासून सुरु होतात.