e-Cigarettes : 'ई-सिगारेट' किंवा 'ई-हुक्का' जवळ बाळगणंही बेकायदेशीर; आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Health Ministry : भारतात कोणत्याही प्रमाणात ई-सिगारेट जवळ बाळगणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.
e-Cigarette Ban
e-Cigarette BaneSakal

भारतामध्ये ई-सिगारेट किंवा तत्सम डिव्हाईस जवळ बाळगणं बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अ‍ॅक्ट (PECA) 2019 या कायद्यानुसार हे सांगण्यात आलं आहे. याबाबत गेल्या महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाला (MCA) स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

PECA कायद्यामध्ये ई-सिगारेटच्या वैयक्तिक वापराबद्दल कोणताही उल्लेख नाही. मात्र, ई-सिगारेटचे उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, साठवण, वितरण आणि जाहिरातींवर बंदी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

e-Cigarette Ban
Dengue Outbreak: बांगलादेशमध्ये डेंग्यूचं थैमान! 1000 लोकांचा मृत्यू

त्यामुळेच, भारतात कोणत्याही प्रमाणात ई-सिगारेट जवळ बाळगणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे उपसचिव डॉ. पुलकेश कुमार यांनी स्पष्ट केलं. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भारतात कशावर बंदी?

भारतात इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम या प्रकारात येणाऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर बंदी आहे. सोबतच हीट नॉट बर्न प्रॉडक्ट्स आणि ई-हुक्का आणि अशाच प्रकारच्या इतर उत्पादनांवर देखील बंदी लागू करण्यात आली आहे.

वेबसाईट्सना नोटीस

मे महिन्यात आरोग्य मंत्रालयाने या कायद्याबाबत एक पब्लिक नोटीस जारी केली होती. तसंच, जुलै महिन्यात मंत्रालयाने ई-सिगारेट विकणाऱ्या आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या 15 वेबसाईट्सना नोटीस देखील पाठवली होती.

e-Cigarette Ban
जळत असलेली सिगारेट खड्ड्यात टाकली अन् क्षणात झाला भीषण स्फोट; अंगावर काटा आणणारा Video Viral

कुठे कराल तक्रार?

ई-सिगारेटची जाहिरात, साठेबाजी किंवा विक्री होत असल्याचं दिसून आल्यास कोणीही याबाबत तक्रार दाखल करू शकतं. यासाठी http://www.violation-reporting.in ही स्वतंत्र वेबसाईट देखील तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com