
अनेक मोबाईल युझर्स वेगवेगळ्या ऍप्स आणि सेवांना आपला डेटा हाताळण्याची परवानगी देऊन टाकतात
लंडन- अनेक मोबाईल युझर्स वेगवेगळ्या अॅप्स आणि सेवांना आपला डेटा हाताळण्याची परवानगी देऊन टाकतात. यावेळी त्यांना किंचितशीही माहिती नसते की, यामुळे त्यांच्या खासगी माहितीमध्ये कंपन्यांकडून शिरकाव केला जातोय. एका नव्या अभ्यासातून समोर आलंय की, लोकेशन ट्रॅकिंगला परवानगी दिल्यानंतर आपण अत्यंत महत्त्वाची खासगी माहिती कंपन्यांना देऊन टाकतो. हा अशाप्रकारचा पहिला अभ्यास असून यातून लोकेशेन ट्रॅकिंग डेटामधून कोणती खासगी माहिती गहाळ होते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. बोलोगना युनिव्हर्सिटी, इटली आणि लंडन युनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी ऍप कंपन्या कशापद्धतीने खासगीपणाच्या पॉलिसीचे उल्लंघन करत आहेत, हे दाखवून दिलंय.
Google Meet वापरायला जमत नाही! मग या टेप्सप्रमाणे शिका लवकर
संशोधकांनी ट्रॅकिंग अॅडवायझर TrackingAdvisor नावाचे एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. यात युझर्सच्या लोकेशनसंबंधी माहिती गोळा केली जाते. लोकशेन डेटाच्या माध्यमातून हे ऍप युझर्सचा खासगी डेटा मिळवते. तसेच या माहितीच्या सत्यतेविषयी जाणून घेण्यासाठी फिडबॅकही मागते. युझर्स ऍप किंवा सेवा घेताना अनेकदा डेटाच्या वापराला परवानगी देऊन टाकतात. यामुळे संवेदनशील खासगी माहिती कंपन्यांना मिळू शकते याची कसलही जाणीव युझर्सला नसते. विशेष करुन लोकेशन ट्रॅकिंकसंबंधी हा धोका जास्त असतो, असं मायक्रो मुसोलेसी म्हणाले.
TrackingAdvisor या मोबाईल अॅपच्या माध्यमातून संधोशकांनी युझर्सची खासगी संवेदनशील माहिती कंपन्यानी कशी मिळते हे दाखवून दिलंय. युझर्स कुठे राहतो, त्याच्या सवयी काय आहेत, त्याचे छंद काय, त्याच्या आवडी-निवडी काय, त्याचा स्वभाव कसा आहे, तो कोणत्या स्थळांना भेट देतो अशा प्रकारची माहिती लोकेशन ट्रँकिंगच्या माध्यमातून घेतली जाते. संधोधकांनी 69 युझर्संना या अभ्यासात सामाविष्ठ केलं होतं. त्यांच्यावर जवळपास 2 आठवडे TrackingAdvisor अॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आले होते.
आता तुमचा स्मार्टफोन घेईल तुमच्या आरोग्याची काळजी, कसे? वाचा सविस्तर
युझर्स जेव्हा लोकेशन ट्रॅकिंगला परनावगी देतात, तेव्हा त्यांची खासगी संवेदनशील माहिती कंपन्याच्या हाती लागते हे स्पष्ट करण्यात आले आहे. लोकेशन ट्रॅकिंगद्वारे तुमचे आरोग्य, तुमची आर्थिक-सामाजिक स्थिती, तुमचा वंश आणि धर्म अशी सर्व माहिती कळू शकते. युझर्सची अशी संवेदनशील माहिती थर्ड पार्टीला विकले जाण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे अॅप कंपन्या युझर्सचा खासगीपणावर अतिक्रमण करतात हे पुन्हा एकदा दिसून येतंय.