ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

Raghav Chadha on Data Reset: टेलिकॉम कंपन्यांकडून देण्यात येणारा डेटा मुदत संपेपर्यंत पूर्ण वापरला नसला तरी रिसेट केला जातो. यावरून राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी कंपन्यांनी ग्राहकांच्या हिताचे धोरण तयार करावे अशी मागणी केली आहे.
Raghav Chadha on Data Reset

Raghav Chadha on Data Reset

Esakal

Updated on

Raghav Chadha: राज्यसभा खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीवरून प्रश्न उपस्थित केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत राघव चड्ढा यांनी म्हटलं की, मोबाईल रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज डेटा मर्यादा असते. यात दीड जीबी, दोन जीबी किंवा ३ जीबी प्रतिदिन डेटा दिला जातो. तो दर २४ तासांनी रीसेट होते. वापर न होणारा डेटा अर्ध्या रात्रीच संपतो. वापरकर्त्यानं त्या डेटासाठी पूर्ण पैसे भरलेले असतात तरी वापर न झालेला डेटा रीसेट केला जातो. Why Does Data Reset at Midnight Raghav Chadha Slams Telecom Companies

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com