Agrobo : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थ्याने तयार केला खास 'ॲगरोबो'; कृत्रीम बुद्धीमत्तेचा केला वापर

शेतकऱ्याचाच मुलगा असल्याने आर्यन बालपणापासून शेतीमधील समस्या जवळून पाहत होता. त्यातूनच त्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रमानव बनविण्याचे ठरविले.
Agrobo
AgroboeSakal

Kota Student Agri Robot : शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत करण्याचे आवाहन नेहमीच केले जाते. आता, राजस्थानातील कोटा शहरातील एका किशोरवयीन मुलाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘ॲगरोबो’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रमानव विकसित केला आहे. आर्यन सिंह असे या सतरावर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आपल्या शाळेतील अटल टिंकरिंग लॅबमध्ये या अनोख्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब हा उपक्रम राबविला जातो. शेतकऱ्याचाच मुलगा असल्याने आर्यन बालपणापासून शेतीमधील समस्या जवळून पाहत होता. त्यातूनच त्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रमानव बनविण्याचे ठरविले. त्याने २०२० मध्ये त्याची सुरुवात केली. सुमारे चार वर्षांच्या कष्टानंतर बनविलेल्या या यंत्रमानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान श्रेणीत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवून दिला.

देशभरातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील हा पुरस्कार जिंकणारी नऊ मुले व दहा मुलींमध्ये आर्यन राजस्थानातील एकमेव होता. नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, २२ जानेवारीला या सर्व मुलांसह त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. आर्यनने यंत्रमानवाचा प्रस्ताव नीती आयोगाच्या अटल नावीन्यता उपक्रम आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविला. सर्वांनी या यंत्रमानवाचे कौतुक केले.

Agrobo
Elon Musk Robot : इलॉन मस्कचा रोबोट घालतोय चक्क कपड्यांची घडी ! घरातल्या कामांमध्येही करू लागला मदत.. पाहा व्हिडिओ

आर्यन पीटीआयशी बोलताना म्हणाला,‘‘शेतकरी कुटुंबातील असल्याने आई-वडील तसेच आजी-आजोबांना बालपणापासून शेतात काम करताना पाहत मोठा झालो. शेतकऱ्याचे शेतातील कष्ट कमी करण्यासाठी अनेक कामे करू शकणारे उपकरण बनविण्याची संकल्पना दहावीत सुचली. त्यातूनच प्रायोगिक तत्त्वावर ‘ॲगरोबो’ हा यंत्रमानव विकसित केला.’’

योजनेतून प्रारंभिक निधी

तो म्हणाला, की सरकारच्या ‘आयस्टार्ट’ या स्टार्टअपसाठीच्या प्रमुख योजनेतून प्रारंभिक निधी देण्यात आला. त्यातून मला जागा, प्रयोगशाळा तसेच प्रोत्साहन मिळाले. ॲगरोबोचे वैशिष्ट्य म्हणजे तो खूप दुरूनही वापरता येऊ शकतो. उदा. एखाद्याचे शेत कोटात असल्यास जयपूरमधूनही ॲपवर लॉग इन करून या यंत्रमानवाकडून काम करून घेतले जाऊ शकते.

या यंत्रमानवाच्या निर्मितीबद्दल आर्यनला १५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आर्यनचे प्रशिक्षक प्रकाश सोनी म्हणाले, कुटुंबाचा शेतातील त्रास पाहून आर्यनला हा यंत्रमानव बनविण्याची प्रेरणा मिळाली. आज त्याचे वडील इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या शेतातील कामे ॲगरोबोकडून करून घेत आहेत.

Agrobo
Tesla Robot Attack : टेस्लाच्या फॅक्टरीमध्ये रोबोटने केला इंजिनिअरवर हल्ला; कंपनीने केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

‘ॲगरोबो’ शेतातील कापणी, सिंचन, माती परीक्षण आदी अनेक कामे करू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्याचे कष्ट कमी होतील. यंत्रमानव बनविण्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला असला तरी त्याचे उत्पादन वाढल्यावर हा खर्च कमी होईल. पुढील वर्षी तो बाजारात उपलब्ध होण्याची आशा आहे.

- आर्यन सिंह, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com