RBI Fraud Report : भारतात पसरतंय ऑनलाईन फ्रॉडचं जाळं ; रिजर्व्ह बँकेच्या रिपोर्टने केला धक्कादायक खुलासा

Online Fraud 2024 : ऑनलाईन फ्रॉडचा आकडा तब्बल १४.५७ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचला
Digital Payment Frauds Rise Sharply in India: RBI and Experts Weigh In
Digital Payment Frauds Rise Sharply in India: RBI and Experts Weigh Inesakal

RBI Report : रिझर्व्ह बँकेने RBI) नुकताच त्यांचा एक अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, भारतात ऑनलाईन पेमेंट फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मार्च २०२४ संपणाऱ्या आर्थिक वर्षात ही वाढ दिसून आली असून, ती तब्बल १४.५७ अब्ज रुपयांपर्यंत (१,४५७ कोटी रुपये) पोहोचली आहे.

या वाढीमागील प्रमुख कारण म्हणजे यूपीआय (UPI) व्यवहारांमध्ये झालेली १३७ टक्क्यांची वाढ होय. गेल्या दोन वर्षात यूपीआय पेमेंट्स २०० लाख कोटी रुपयांपर्यंतपोहोचले आहे, असे आरबीआयच्या माहितीवरून स्पष्ट होते.

देशात स्वस्त दरात उपलब्ध होणारा इंटरनेट आणि आर्थिक समावेशनामुळे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट्स केले जात आहेत. मात्र, या वाढत्या ऑनलाईन पेमेंट्समुळे फसवणूक करणाऱ्यांनाही अधिक संधी मिळत आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०१६ मध्ये यूपीआय सुरू झाल्यापासून भारतात डिजिटल पेमेंट क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. याच काळात ऑनलाईन पेमेंट फसवणुकांमध्येही वाढ झाली आहे.

Digital Payment Frauds Rise Sharply in India: RBI and Experts Weigh In
Truecaller AI Scam Scanner : स्कॅमर्सवर लागणार लगाम; ट्रू कॉलरने लाँच केलंय हे नवीन AI फिचर

अहवालात असेही म्हटले आहे की, कार्ड आणि इंटरनेट व्यवहारांसह डिजिटल पेमेंट्स आता एकूण फसवणूक रकमेच्या १०.४ टक्के आहेत. २०२३ च्या आर्थिक वर्षात हा आकडा फक्त १.१ टक्के होता.

तज्ज्ञांच्या मते, डिजिटल पेमेंट्स लोकप्रिय होत असताना लोकांचे आर्थिक ज्ञान मात्र कमीच राहते. त्यामुळे अशा फसवणूंना बळी पडण्याची शक्यता वाढते. याशिवाय, बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याच्या नादात आर्थिक संस्था आणि फिनटेक कंपन्या नियंत्रण शिथिल करत आहेत, त्यामुळेही फसवणूक वाढण्यास मदत होते.

स्वतःची आर्थिक सुरक्षा कशी कराल?

या वाढत्या फसवणूंना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जनजागृती मोहीम राबवल्या आहेत. या मोहिमांमध्ये प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातींचा समावेश आहे. या जाहिरातींद्वारे लोकांना आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन सुरक्षेबाबत माहिती दिली जाते.

Digital Payment Frauds Rise Sharply in India: RBI and Experts Weigh In
Email Phishing : चुकीच्या ईमेलवर एक क्लिक अन्..बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं; जाणून घ्या काय आहे हा स्कॅम

आपल्या पैशाची सुरक्षा करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या बँकेच्या अधिकृत अॅपचा वापर करा. अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. फोनवर किंवा मेसेजवर आलेल्या ओटीपी किंवा पिन कोणालाही देऊ नका. तुमच्या बँकेच्या हेल्पलाइनवरच संपर्क साधा. तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली तर बँकेला त्वरित कळवा. सतर्क राहा आणि सुरक्षित राहा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com