esakal | Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत आणि फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

Realme 8i

Realme 8i स्मार्टफोन भारतात लॉंच; पाहा किंमत आणि फीचर्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

स्मार्टफोन बनवणारी कंपनी Realme ने आज आपल्या 8 सीरीजला पुढे नेत भारतात Realme 8i आणि Realme 8s 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या दमदार फोनमध्ये MediaTekIndia Dimensity 810 5G चिपसेट वापरण्यात असून हे आतापर्यंत कोणत्याही स्मार्टफोनमध्ये वापरला गेला नाही. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh जंबो बॅटरीसह 50 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. चला तर मग डिटेलमध्ये जाणून घेऊ Realme 8i स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल…

Realme 8i स्मार्टफोन लेटेस्ट हा Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये यात 6.6-इंच HD+ डिस्प्ले दिला आहे ज्याचे रिझोल्यूशन 2412 x 1080 पिक्सेल, 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 180Hz चा टच सॅम्पलिंग रेट आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 96 प्रोसेसर देण्यात आला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने याचे इंटरनल स्टोरेज वाढवता देखील येते.

realme 8i चा कॅमेरा

कंपनीने Realme 8i स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील पहिला सेन्सर 50MP चा आहे. इतर सेन्सर मध्ये 2 एमपी लेन्स याशिवाय फोनमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 एमपी कॅमेरा दिला जात आहे.

हेही वाचा: कमी किंमतीत भरपूर स्पेस, कमर्शियल वापरासाठी या कार आहेत बेस्ट

realme 8i ची बॅटरी

Realme 8i स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. याची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ड्युअल सिम, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आली आहेत.

किंमत काय असेल?

Realme 8i स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज प्रकारात उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 13,999 आणि 15,999 रुपये आहे. हा हँडसेट स्पेस ब्लॅक आणि पर्पल रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. तसेत 14 सप्टेंबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर या डिव्हाइसची विक्री सुरू होईल.

हेही वाचा: नासाने शोधून काढला पृथ्वीजवळ आलेला १००० वा 'लघुग्रह'

loading image
go to top