esakal | कमी किंमतीत भरपूर स्पेस, कमर्शियल वापरासाठी 'या' कार आहेत बेस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Mahindra Marazzo

कमी किंमतीत भरपूर स्पेस, कमर्शियल वापरासाठी या कार आहेत बेस्ट

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

जर तुम्ही येत्या काळात तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला एखादे वाहन हवे असेल ज्याचा वापर व्यवसाय वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो, तर आज आज आपण अशा काही गाड्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पर्सनल कामासाठी तसेच कमर्शियल कामांसाठी देखील वापरल्या जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या कार आणि त्यांचे फीचर्स काय आहेत.

महिंद्रा मराझो (Mahindra Marazzo)

महिंद्रा मराझोमध्ये कंपनीने या गाडीत 1.5 लिटर डिझेल इंजिन दिले आहे, ज्यामुळे हे इंजिन 3,500 आरपीएमवर 121 बीएचपी मॅक्झिमम पावर आणि 1,750 ते 2,500 आरपीएमवर 300 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क निर्माण करू शकते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह बाजारात उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर या शक्तिशाली MPV मध्ये ऑटोमॅटीक क्लायमॅट कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर पार्किंग कॅमेरा अशी वैशिष्ट्ये आहेत. महिंद्रा मराझोची किंमत 11.64 रुपये पासून सुरु होते (दिल्ली एक्स-शोरूम).

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

तुम्ही Maruti Suzuki Eeco चा व्यावसायासाठी चांगला वापर करू शकता. भरपूर स्पेस असणारी ही गाडी देखील बाजारात उपलब्ध आहे आणि त्यात बरेच सामान ठेवले जाऊ शकते. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्ही ही कार नक्की वापरू शकताच. तसेच तुम्हा घरगुती कामांसाठी देखील हीचा वापर करु शकता. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत प्रवास करायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट कार ठरेल. यात 1196 सीसी 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. Eeco ची किंमत 3,97,800 रुपये पासून सुरु होते (दिल्ली एक्स-शोरूम).

हेही वाचा: ओला इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री सुरू; जाणून घ्या बुकिंग प्रोसेस

महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे तर, बोलेरो B4 BS6 (DIESEL) -2WD मध्ये BS6 कम्प्लायंट 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3,600 rpm वर मॅक्सिमम 75 bhp ची पॉवर आणि 1,600 ते 2,200 rpm वर 210 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बोलेरोचे शक्तिशाली इंजिनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. तसेच सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ग्राहकांना या एसयूव्हीमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, ड्रायव्हर एअर बॅग आणि को-ड्रायव्हर ऑक्युपंट डिटेक्शन सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर देण्यात आले आहे. या SUV ची किंमत 8.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

मारुती सुझुकी अर्टिगा 1.5-लीटर बीएस 6, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते ज्यामध्ये HSVS (सुझुकीचे स्मार्ट हायब्रिड व्हेइकल) सिस्टीम देण्यात आली आहे. हे इंजिन 6,000 आरपीएमवर 103 बीएचपी आणि 4,400 आरपीएमवर 138 एनएम टॉर्क जनरेट करते. याची किंमत 7.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

हेही वाचा: 20 हजारात खेरेदी करा 'हे' दमदार 5G स्मार्टफोन्स, पाहा फीचर्स

loading image
go to top