Redmi Note 11 ग्लोबल व्हेरिएंटचे लॉंच 26 तारखेला, पाहा अपेक्षित फीचर्स

Redmi Note 11
Redmi Note 11

Redmi Note 11 सीरीज चे जागतिक लॉन्च 26 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती कंपनीकडून कंफर्म करण्यात आली आहे. मात्र कंपनीने अद्याप या सीरीजमधील सर्व मॉडेल्स कन्फर्म केलेले नाहीत. दरम्यान Redmi Note 11 सीरीजच्या व्हॅनिला वेरिएंटचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स रिटेलर साइटच्या लीस्टमध्ये हे समोर आले आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन फ्लॅगशिप प्रोसेसर आणि क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला असून समोरच्या कॅमेऱ्यासाठी पंच होल दिले आहे. यासोबतच Redmi Note 11 व्हॅनिला वेरिएंटची किंमत देखील लिस्टिंगमध्ये नमूद करण्यात आली आहे.

Twitter यूजर @swayneverrmind (Via Xiaomiui , TechInsider ) हे वेबपेज पहिल्यांदा स्पॉट केले ज्यात Redmi Note 11 Vanilla चे फीचर्स आणि किंमतीचे डिटेल्स दिले आहेत. ही लीस्ट ऑनलाइन रिटेलर Shopee साठीची आहे. ज्यामध्ये Redmi Note 11 ची किंमत ₱ 8,999 (जवळपास 13 हजार रुपये) सांगितली आहे. रेडमी नोट 11 च्या फीचर्सची संपूर्ण यादी रिटेलरच्या या पेजवर दिली असून लीस्टमध्ये दिलेल्या फोटोनुसार Redmi Note 11 Vanilla मध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे.

फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह FHD+ AMOLED डिस्प्ले असून ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देखील दिले आहेत. क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेल मुख्य लेन्स तसेच अल्ट्रावाइड युनिट आणि मॅक्रो शूटर असल्याचे सांगितले जाते. याशिवाय फोनच्या बॅटरी क्षमतेची माहिती देखील या लिस्टमध्ये देण्यात आली आहे. Redmi Note 11 मध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी दिली आहे. या लिस्ट केलेल्या फोटोमध्ये दिलेले फीचर्स फोनसह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या फीचर्ससोबत जुळताना दिसत नाहीयेत.

Redmi Note 11
कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या 5 बेस्ट कार, देतात दमदार मायलेज

जर Redmi Note 11 Vanilla चे स्पेसिफिकेशन्स इथे दिले आहेत , जर हा फोन त्यांच्या सोबतच मार्केट मध्ये लॉन्च केला गेला तर तो Redmi Note 10 सारखाच असेल. Redmi Note 10 आणि Redmi Note 11 Vanilla चे अनेक स्पेसिफिकेशन्स बऱ्याच प्रमाणात एकसारखेच आहेत. तथापि, Redmi Note 11 सीरीजचे अधिकृत लॉन्च 26 जानेवारी रोजी होणार आहे, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत या सीरीजमधील आणखी काही लीक्सही समोर येऊ शकतात.

Redmi Note 11
jio चे स्वस्तात मस्त प्लॅन; मिळतो 1.5GB डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com