Altoला टक्कर देणार ही दमदार गाडी; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Renault Kwid 2022

Altoला टक्कर देणार ही दमदार गाडी; जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

Renault Kwid 2022: भारतात परवडणाऱ्या वाहनांना मोठी मागणी आहे. परवडणाऱ्या किंमतींसोबतच उत्तम मायलेज ही अनेक ग्राहकांची प्राथमिकता असते. मारुती अल्टो (Maruti Alto 800) ही देशातील सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. कमी किंमत आणि चांगले मायलेज यामुळे लोकांना ती खूप आवडते. मारुती अल्टोला टक्कर देण्यासाठी रेनो (Renault) आपली नवी कार बाजारात आणत आहे. रेनो क्विड (Renault Kwid 2022) ही नवीन कार भारतीय कार बाजारात लवकरच दाखल होत आहे.

हेही वाचा: सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

इंजिन (Engine)-

Kwid 2022 दोन इंजिन पर्यायांमध्ये येते - 0.8L पेट्रोल आणि 1.0L पेट्रोल. पहिले इंजिन 54PS पॉवर आणि 72Nm टॉर्क जनरेट करते, तर दुसरे इंजिन 68PS पॉवर आणि 91Nm टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय आहेत. अल्टोला पॉवरिंग 0.8-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे (5-स्पीड मॅन्युअलसह). हे 48PS आणि 69Nm देते. Alto ला CNG चा पर्याय देखील मिळतो, यामुळे अल्टो 31KM पेक्षा जास्त मायलेज देते.

हेही वाचा: टाटा Tiago आणि Tigor CNG कार जानेवारीमध्ये लाँच होणार?

किंमत (Price)-

Renault Kwid 2022 च्या बेस व्हेरिएंटच्या किंमती 4.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.83 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. मारुती अल्टो हॅचबॅकची किंमत 3.25 लाख ते 4.95 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत आहे.

Web Title: Renault Kwid 2022 Will Be Compate With Maruti Alto 800

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top