Renault TRIBER चे नवीन एडिशन लॉन्च; पाहा काय असेल किंमत अन् फीचर्स

Renault TRIBER new edition
Renault TRIBER new edition
Updated on

Renault TRIBER new edition : फ्रेंच ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी Renault ने देशांतर्गत बाजारात आपल्या कॉम्पॅक्ट मल्टिपर्पज SUV Triber (Renault TRIBER) ची नवीन आवृत्ती सादर केली आहे. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 7.24 लाख रुपये आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, कंपनीने या कारच्या एक लाख युनिट्सच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन आवृत्ती (News Edition) लॉन्च केली आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये लॉंच केले होते हे मॉडेल

रिपोर्टनुसार, रेनॉल्टने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, देशभरात रेनॉल्ट ब्रँडच्या वाढीमध्ये ट्रायबरने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारत आणि फ्रान्समधील रेनॉल्ट संघाच्या जॉइंट प्रोजेक्टचा हा परिणाम आहे. Renault ने ऑगस्ट 2019 मध्ये हे मॉडेल सादर केले होते. कंपनीने सांगितले की, ही कार खास भारतीय बाजारपेठेतील नवीन उत्पादनांच्या संधी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.

Renault TRIBER new edition
Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांपेक्षा कमीत बेस्ट प्लॅन, पाहा यादी

1 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध

कंपनीच्या मते, नवीन ट्रायबर (Renault TRIBER new edition) एक लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे आणि ते 'मॅन्युअल' आणि 'इझी-आर ऑटोमॅटिक मॅन्युअल' पर्यायांसह येते. कंपनीने सांगितले की ट्रायबरला ग्लोबल NCAP कडून प्रौढांच्या सुरक्षेसाठी 4-स्टार सुरक्षा रेटिंग आणि मुलांसाठी 3-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

Renault TRIBER new edition
Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कूटर, आता 'या' शहरात देखील होणार विक्री

7 सीटर कारचे फीचर्स

Renault Triber ही 7 सीटर कार आहे. कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि मागील पार्किंग सेन्सर दिले आहे. तिसऱ्या रांगेतील सीट फोल्ड करता येताल . तसेच Renault Triber मध्ये 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे. इंजिन 96Nm चा पीक टॉर्क जनरेट करते आणि 72ps पॉवर देते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 5-स्पीड EASY-R AMT शी जोडले जाऊ शकते.

Renault TRIBER new edition
दाऊदच्या 'डी-कंपनी'कडून क्रिप्टोचा वापर, ED चे साथिदारांवर छापे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com