Royal Enfieldच्या 'या' तीन माॅडल्स देश-विदेशात लोकप्रिय

बुलेटसारखी दमदार मोटारसायकल बनवणारी कंपनी राॅयल एनफिल्डच्या विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Royal Enfield
Royal Enfield esakal

नवी दिल्ली : बुलेटसारखी दमदार मोटारसायकल बनवणारी कंपनी राॅयल एनफिल्डच्या (Royal Enfield) विक्रीत जबरदस्त वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीच्या विक्रीत नोव्हेंबरच्या तुलनेत वाढ झाली आहे. कंपनीच्या अनेक माॅडलचे चाहते देश-विदेशात आहे. त्यात Classic 350, Meteor350 आणि Himalayan चा समावेश आहे. (Royal Enfield Sales Up In December 2021, Classic 350 meteor, Himalayan models Popular In Worldwide)

Royal Enfield
CNG कार खरेदीसाठी आणखी एक पर्याय, Tata Tiago सीएनजीची प्री-बुकिंग सुरु

मागणी वाढली

डिसेंबर २०२१ मध्ये राॅयल एनफिल्डची मागणी देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली आहे. डिसेंबरमध्ये कंपनीने एकूण ७३ हजार ७३९ मोटारसायकल विकल्या गेल्या आहेत. यात ६५ हजार १८७ मोटारसायकलची विक्री देशाअंतर्गत झाली आहे. दुसरीकडे ८ हजार ५५२ युनिट इतके निर्यात झाले. मात्र नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीची देशातील विक्री ४४ हजार ८३० युनिट होती. डिसेंबर २०२० मध्ये हा आकडा ६५ हजार ४९५ युनिट झाला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारात कंपनीची विक्री म्हणावी अशी चांगली नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये सणोत्सवाचा काळ असूनही विक्री ४० हजार ६११ युनिट, सप्टेंबरमध्ये २७ हजार २३३ युनिट, ऑगस्टमध्ये ३९ हजार ७० युनिट होती. कंपनीने ६५ युनिटपेक्षा जास्त विक्री फेब्रूवारी २०२१ च्या शेवट झाली होती. त्यानंतर विक्री सतत घटली आहे.

Royal Enfield
कमी किमतीत 'या' आहेत बेस्ट बाईक्स, मिळेल 90Kmpl मायलेज

३५० सीसीवरील माॅडलची विक्री वाढली

डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीचे ३५० सीसी वरील माॅडलच्या विक्रीत वाढ नोंदवली गेली आहे. या सेगमेंटमध्ये कंपनीच्या ११ हजार १९६ मोटारसायकल्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये ५ हजार ४१५ युनिट होती. अशा प्रकारे यात १०६.७६ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. दुसरीकडे नोव्हेंबर २०२१ मध्ये ८ हजार ३०८ युनिटची तुलनेत ही विक्री ३४.७६ टक्क्याने वाढ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com