S Somanath : जगात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणाऱ्या बदलांपैकी सर्वात जास्त बदल भारतात; इस्रोचे प्रमुख म्हणतात आपला देश 'विकसित'

Antariksh Mahayatra : विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंतरिक्ष महायात्रा’च्या समारोपीय समारंभात सोमनाथ बोलत होते.
S Somanath Antariksh Mahayatra
S Somanath Antariksh MahayatraeSakal

S Somanath Antariksh Mahayatra : आता भारत महासत्ता होण्याकडे प्रवास करतो आहे. देश विश्वगुरु होणे हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. विकसित होण्याबाबत बोलायचे झाल्यास आपण पूर्वीपासूनच विकसित देशासारखे वागत आलो आहोत. त्यामुळे, आपला भारत हा विकसनशील नव्हे तर विकसित देश आहे, असे मत भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इसरो) संचालक एस. सोमनाथ यांनी व्यक्त केले.

विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंतरिक्ष महायात्रा’च्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मांडे, डॉ. प्रकाश चव्हाण, इस्रोचे वैज्ञानिक एन. सुधीरकुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक डॉ. शिवकुमार शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते.

इसरोतर्फे विदर्भातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून ‘स्पेस ऑन व्हील’ अंतर्गत इसरोच्या विविध मिशन व उपकरणांची माहिती देण्यात आली. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. या समारोपीय सोहळ्यात उपक्रमाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

S Somanath Antariksh Mahayatra
ISRO Pushpak Viman : इस्रोच्या 'पुष्पक' विमानाने रचला इतिहास! भारताच्या पहिल्या रीयूजेबल लाँच व्हीकलची चाचणी यशस्वी

एस. सोमनाथ म्हणाले, जगात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने होणाऱ्या बदलांपैकी सर्वात जास्त बदल भारतामध्ये होत आहेत. अमेरिका जेव्हा पहिल्यांदा चंद्रावर पोहोचला तेव्हा आपण एक छोटे रॉकेट तयार करत होतो. आज आपण चंद्राच्या अशा भागावर पोहोचलो असून तिथे आजवर कुणीही पोहोचले नाही.

देश विश्‍वगुरू होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यास त्याचे परिणाम यापेक्षा अधिक वेगळे असतील, असेही ते म्हणाले. ‘स्पेस ऑन व्हील’ या उपक्रमाची संकल्पना एन. सुधीरकुमार यांची होती. त्यांनी या संकल्पनेच्या प्रारंभाविषयी माहिती देत विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर मांडे यांनी केले. संचालन नीलेश यांनी केले. परतवाडा (जि. अमरावती) येथील विद्यार्थी स्वयंसेवक सौरभ वैद्य याने स्वयंसेवकांतर्फे मनोगत व्यक्त केले. यावेळी विदर्भातील विविध भागांमधील शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.

S Somanath Antariksh Mahayatra
ISRO Chief S Somanath : आदित्य-L1च्या लाँचिंगच्या दिवशीच झालं कँसरचं निदान, तरीही...; इस्रो प्रमुखांचा मोठा खुलासा

स्पेस स्टेशन तयार करण्याचे ध्येय

स्पेस क्षेत्र हे खर्चिक असून आपण त्यामधील समस्यांवरसुद्धा आता मात करतो आहे. ‘चांद्रयान ३’ हे त्यापैकी एक आहे. याचे तंत्र देशात विकसित झाले. हे सर्व ज्ञान देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचे एस. सोमनाथ म्हणाले. आम्ही नावीन्यपूर्ण आणि प्रेरणा देणाऱ्या मिशनवर काम करीत आहोत. स्पेस स्टेशन तयार करण्याचे इसरोचे ध्येय असून त्यादृष्टीने आम्ही वैज्ञानिकांचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com