Samsung Mobile : 'सॅमसंग'कडून स्वस्तातल्या Galaxy A15- 5G नवीन मेमरी व्हेरिएंट मोबाईलची घोषणा

New Mobile Launch : Samsung या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक कंपनीने गुरुवारी गॅलेक्‍सी A15 चा नवीन स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट 6 GB + 128 GBच्‍या लाँचची घोषणा केली. या व्‍हेरिएण्‍टची किंमत 16 हजार 499 रूपये आहे.
Samsung Mobile
Samsung Mobileesakal

New Mobile Launch : Samsung या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक कंपनीने गुरुवारी गॅलेक्‍सी A15 चा नवीन स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट 6 GB + 128 GBच्‍या लाँचची घोषणा केली. या व्‍हेरिएण्‍टची किंमत 16 हजार 499 रूपये आहे.

भर करण्‍यात आलेला नवीन स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट गॅलेक्‍सी A15 5G खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना अधिक पर्याय देईल. हा स्‍मार्टफोन सध्‍या 8 जीबी + 156 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असून ब्‍ल्‍यू ब्‍लॅक, ब्‍ल्‍यू आणि लाइट ब्‍ल्‍यू या तीन आकर्षक रंगांमध्‍ये येतो.

काऊंटरपॉइण्‍ट रिसर्चनुसार, गॅलेक्‍सी ए१५ ५जी २०२३ साठी भारतातील पहिला विक्री करण्‍यात आलेला ५जी स्‍मार्टफोन गॅलेक्‍सी ए१४ ५जीला मिळालेल्‍या यशानंतर लाँच करण्‍यात आला आहे. यामधून स्वस्त दरात इनोव्‍हेशन्‍स देण्यामध्ये सॅमसंगने आगेकूच केल्याचे दिसून येत आहे.

गॅलेक्‍सी ए१५ ५जी मध्‍ये प्रिमिअम फिलसाठी गॅलेक्‍सीच्या सिग्‍नेचर डिझाइनसह हेज फिनिशमधील ग्‍लास्टिक बॅक पॅनेल आहे. साइड पॅनेलवरील नवीन प्रमुख आयलँड डिझाइन आणि फ्लॅट लीनियर कॅमेरा सेटअप सुधारित ग्रिप आहे.

यासह गॅलेक्‍सी ए१५ ५जी मध्‍ये ६.५-इंच सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आहे. ज्‍यामध्‍ये व्हिजन बूस्‍टर आहे, जे ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह सुलभ, प्रखर व वैविध्‍यपूर्ण व्‍युईंग अनुभव देते, तसेच लो ब्‍ल्‍यू लाइट डिस्‍प्‍ले डोळ्यांना आरामदायीपणाची खात्री देतो.

Samsung Mobile
Sharad Pawar : गोविंदबागेत शिंदे-फडणवीस? शरद पवार यांचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण....

गॅलेक्‍सी ए१५ ५जी हा फोन नॉक्‍स सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्मसहीत आहे. त्यामुळे वापरकर्त्‍यांना ऑटो ब्‍लॉकर, प्रायव्‍हसी डॅशबोर्ड, सॅमसंग पासकी अशा वैशिष्‍ट्यांच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या डेटावर नियंत्रण ठेवता येते. या डिवाईसमध्‍ये चिप लेव्‍हलवर निर्माण करण्‍यात आलेले नॉक्‍स वॉल्‍ट चिपसेट आहे, जे पिन, पासवर्ड्स व पॅटर्न्‍स अशा संवदेनशील डेटाचे संरक्षण करण्‍यासाठी, तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर धोक्‍यांपासून संरक्षणासाठी स्‍वतंत्र टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट स्‍टोरेजसह डिझाइन करण्‍यात आले आहे. उच्‍च दर्जाची प्रायव्‍हसी व सिक्‍युरिटी वैशिष्‍ट्ये असलेला गॅलॅक्‍सी ए१५ ५जी ओएस अपग्रेड्सच्‍या जवळपास ४ जनरेशन्‍स आणि सिक्‍युरिटी अपडेट्सच्‍या जवळपास ५ वर्षांसह फ्यूचर-रेडी असण्‍यास डिझाइन करण्‍यात आला आहे.

Samsung Mobile
Loksabha Election 2024 : ‘मिशन ४५’ साठी काहीही? अमरावतीत राणा, मावळमध्ये बारणे कमळावर निवडणूक लढवणार?

गॅलेक्‍सी ए१५ ५जी मध्‍ये सॅमसंग वॉलेट देखील आहे, जे वापरकर्त्यांना आयडी स्‍टोअर करण्‍यासाठी आणि पेमेंट्स सुविधेला नव्‍या उंचीवर नेण्‍यासाठी विनासायास काम करते. यामध्‍ये मीडियाटेक डायमेन्सिटी ६१००+ प्रोसेसर आहे. ज्‍यामुळे एकाचवेळी मल्‍टीटास्किंग अनुभवासाठी अधिक पॉवर व स्‍पीड मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com