सॅमसंगचे दोन नवे दमदार लॅपटॉप लॉंच, मिळते 21 तासांची बॅटरी लाईफ | Galaxy Book2 Pro and Book2 Pro 360 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samsung galaxy book2 pro and book2 pro 360 laptops launched check features and details

सॅमसंगचे दोन नवे दमदार लॅपटॉप लॉंच, मिळते 21 तासांची बॅटरी लाईफ

सॅमसंग (Samsung) कंपनीने त्यांचे दोन नवीन लॅपटॉप्स Galaxy Book2 Pro आणि Galaxy Book2 Pro 360 लाँच केले आहेत. कंपनीने हे दोन्ही लॅपटॉप MWC 2022 (मोबाइल वर्ल्ड काँग्रेस) मध्ये लॉन्च केले आहेत. Galaxy Book 2 Pro सिल्व्हर आणि ग्रेफाइट कलर ऑप्सनमध्ये येतो आणि त्याची किंमत $1049 (अंदाजे रु 79,300) आहे. त्याच वेळी, Galaxy Book 2 Pro 360 बरगंडी, ग्रेफाइट आणि सिल्व्हर कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि त्याची किंमत $1249 (सुमारे 94,400 रुपये) आहे. दोन्ही लॅपटॉपची विक्री 1 एप्रिलपासून अमेरिकेत सुरू होणार आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

दोन्ही लॅपटॉपमध्ये, कंपनी 16: 9 च्या आस्पेक्ट रेशोसह फुल एचडी रिझोल्यूशनसह AMOLED डिस्प्ले देत आहे आणि त्यांची ब्राइटनेस 400 nits आहे. विशेष बाब म्हणजे एचडीआर कंटेंट पाहताना त्याची ब्राइटनेस 500 निट्सपर्यंत पोहोचते. आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, Galaxy Book 2 Pro मध्ये 13.3-इंचाचा डिस्प्ले आहे आणि Galaxy Book 2 Pro 360 मध्ये 15.6-इंचाचा डिस्प्ले आहे. Book2 Pro चे वजन 1.04kg आहे आणि Book2 Pro 360 चे वजन 1.41kg आहे.

हेही वाचा: शिवराय आणि रामदासांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही - सुप्रिया सुळे

दोन्ही लॅपटॉप 32GB पर्यंत LPDDDR5 RAM आणि 1TB पर्यंत NVMe SDD स्टोरेजसह येतात. यामध्ये कंपनी 12 व्या जनरेशनचे इंटेल कोर i7 आणि Core i5 प्रोसेसर देत आहे. दोन्ही मॉडेल Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात आणि त्यांना S Pen सपोर्ट देखील दिला आहे.

हेही वाचा: बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने Book 2 Pro मध्ये 63Wh आणि Book 2 Pro 360 मध्ये 68Wh ची बॅटरी दिली आहे. विशेष बाब म्हणजे हे दोन्ही लॅपटॉप 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी एका चार्जवर 21 तासांपर्यंत बॅकअप देते. चांगल्या आवाजासाठी, कंपनी डॉल्बी एटमॉस ड्युअल स्टीरिओ 4 स्पीकर देत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Thunderbolt 4 आणि Wi-Fi 6E व्यतिरिक्त, त्यात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

हेही वाचा: ऑपरेशन गंगा अंतर्गत 5 वे विमान भारतात; 249 नागरिक परतले मायदेशी

Web Title: Samsung Galaxy Book2 Pro And Book2 Pro 360 Laptops Launched Check Features And Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :LaptopSamsung
go to top