Samsung Display : सॅमसंग मोफत बदलून देणार बॅटरी अन् डिस्प्ले; ऑफर फक्त ठराविक स्मार्टफोनसाठीच.. जाणून घ्या

सॅमसंगने आपल्या या नवीन स्मार्टफोन सीरीजमध्ये Super AMOLED Display दिला होता. मात्र, त्याच डिस्प्लेवर आता हिरव्या रेषा दिसत असल्यामुळे यूजर्सना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Samsung Display Exchange Offer
Samsung Display Exchange OffereSakal

Samsung Display Green Line : जर तुम्ही सॅमसंगचा फोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सॅमसंगच्या Galaxy S21 आणि Galaxy S22 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे या फोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाईन दिसत आहे. याबाबत कित्येक यूजर्सनी तक्रार देखील केली आहे.

आता सॅमसंगने याची दखल घेतली असून, ज्या ग्राहकांना ही समस्या दिसत आहे, त्यांना मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देण्याची हमी कंपनीने दिली आहे. सॅमसंगने आपल्या या नवीन स्मार्टफोन सीरीजमध्ये Super AMOLED Display दिला होता. मात्र, त्याच डिस्प्लेवर आता हिरव्या रेषा दिसत असल्यामुळे यूजर्सना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कित्येक देशांमध्ये ही समस्या दिसून आल्यामुळे आता कंपनीने फ्री वन-टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट देण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी देखील Galaxy S20 आणि Galaxy Note 20 सीरीजमध्ये अशीच समस्या दिसत होती. यानंतर कंपनीने या फोनमधील डिस्प्ले मोफत बदलून देण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता S21, S22 या सीरीजमध्ये देखील हीच समस्या दिसून येत आहे.

Samsung Display Exchange Offer
PLI Scheme: सॅमसंग, टाटासह 'या' कंपन्यांना होणार फायदा; मोदी सरकार देणार हजारो कोटींचा निधी, काय आहे कारण?

कधीपर्यंत आहे ऑफर?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग केवळ डिस्प्लेच नाही तर बॅटरीही मोफत बदलून देत आहे. मात्र या ऑफरसाठी कंपनीने एक डेडलाईन निश्चित केली आहे. भारतामध्ये केवळ 30 एप्रिल 2024 पर्यंतच ही ऑफर उपलब्ध असणार आहे. बॅटरी आणि डिस्प्ले किट बदलणं म्हणजे तुमचा संपूर्ण फोनच नवा करुन घेण्यासारखं आहे.

यासाठी तुम्हाला केवळ जवळच्या सॅमसंग स्टोअरला भेट द्यावी लागणार आहे. 30 एप्रिलनंतर याठिकाणी गेल्यास तुम्हाला स्क्रीन किंवा बॅटरी बदलण्यासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. त्यामुळेच ग्राहकांनी लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा असं आवाहन कंपनीतर्फे करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com