Shocking News : अबब! 5 रुपयांच्या नादात चक्क एक लाख रुपये गमावले

ऑनलाइनच्या या जगात अनेक लोक ऑनलाईन फ्रॉडलाही सामोरे जातात.
Shocking News
Shocking News sakal

Online Fraud : इंटरनेट आल्यापासून अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या. दैनंदिन वापरातील गोष्टी असो की फ्लाइट किंवा रेल्वेच्या बुकिंगपर्यंत सर्व पेमेंट ऑनलाइन आहे. ऑनलाइनच्या या जगात अनेक लोक ऑनलाईन फ्रॉडलाही सामोरे जातात.

नुकतेच बँगलोरमध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. येथे एका 43 वर्षाच्या व्यक्तीला डीटीएच प्लानला बदलण्याचा प्रयत्न करत असताना फ्रॉडला सामोरे जावे लागले. धक्कादायक म्हणजे त्यांनी पाच रुपयांसाठी चक्क एक लाख रुपये गमावले. ( Shocking News a Man loses Rs 1 lakh while paying 5 as top-up charge to change dth plan banglore )

ठेकेदारीचं काम करणाऱ्या या व्यक्तीला आपल्या डीटीएच प्लानला बदलायचं होतं. मात्र 5 रुपयांचा टॉप-अप रिचार्ज करताना काही फ्रॉड लोकांनी त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.

आपल्या डीटीएच प्लानमध्ये एक कन्नड चॅनल कनेक्ट करण्यासाठी या व्यक्तीने गूगलवर सर्च केले. येथे त्यांना एक कस्टमर केयर नंबर मिळाला. कॉल केल्यानंतर समोरचा व्यक्तीने दावा केला की ते डीटीएच फर्ममधून बोलत आहे.

Shocking News
Online Fraud : कुठून सुचतं एवढं? नातवाचा हूबेहूब आवाज काढला अन् वृद्धास लावला 18 लाखांचा चूना

जेव्हा या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीला आपल्या डीटीएच प्लान मध्ये कन्नड चॅनल जोडण्यास सांगितले तेव्हा समोरच्या व्यक्तीने 5 रुपये देऊन तुम्ही आपल्या प्लान मध्ये चॅनल जोडू शकता,असे सांगितले. यासाठी तुमच्या नंबर वर एक लिंक येणार आणि त्या मार्फत तुम्ही 5 रुपये भरू शकता.

त्यानंतर या व्यक्तीला Whatsapp वर एक लिंक आली जेव्हा या व्यक्तीने या लिंकवर आपल्या यूपीआय आयडी जोडली तर सुरवातीला एक रुपया कपात झाला मात्र रात्री त्याच्या अकाउंटमधून 99 हजार पेक्षा जास्त रुपये काढण्यात आले.

Shocking News
KYC Fraud : KYC च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; अशी घ्या काळजी

प्रकरण उघडकीस येताच या व्यक्तीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे. दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे ऑनलाईन व्यव्हार करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com