प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होणार Skoda Slavia, काय असेल खास? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

skoda slavia launch

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होणार Skoda Slavia, काय असेल खास? वाचा

Skoda Auto India उद्या म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी त्यांची नवीन स्लाव्हिया (Skoda Slavia) ही मध्यम आकाराची सेडान कार लाँच करणार आहे. हे अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल या तीन ट्रिममध्ये लॉन्च केले जाईल. यामध्ये तुम्हाला 1.0L 3-सिलेंडर TSI आणि 1.5L 4-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन मिळेल. कंपनी 28 फेब्रुवारी रोजी 1.0L पेट्रोल प्रकाराच्या किंमती जाहीर करेल, तर 1.5L पेट्रोल मॉडेल 3 मार्च 2022 रोजी सादर केले जाईल. किंमत जाहीर केल्यानंतर या कारची डिलिव्हरी सुरू होईल.

नवीन स्कोडा सेडान मॉडेलची किंमत 10 लाख ते 16 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. मध्यम आकाराची सेडान स्कोडा स्लाव्हिया या सेगमेंटमध्ये होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाझ, ह्युंदाई वेर्ना आणि आगामी फोक्सवॅगन व्हर्टस यांच्याशी स्पर्धा करेल. Volkswagen Vertus चे अनावरण 8 मार्च रोजी केले जाईल आणि मे 2022 मध्ये लॉन्च केले जाईल.

इंजिन

स्कोडा स्लाव्हिया दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. पहिले 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 110 hp पॉवर आणि 175 Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. दुसरे 1.5-लिटर, चार-सिलेंडर TSI इंजिन आहे जे 150 hp आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. ऑटोमॅटिक प्रेमींसाठी, सहा-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर आणि सात-स्पीड DSG गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

हेही वाचा: तुम्ही करदाते आहात? मग 'हे' महत्वाचे काम लगेच करा, उद्या शेवटची तारीख

फीचर्स

ही नवीन सेडान MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. तुम्हाला आठवण करून देतो की हा तोच प्लॅटफॉर्म आहे ज्यावर ग्राहकांनी Kushaq ला खूप पसंती मिळाली आहे. स्कोडा स्लाव्हिया अॅक्टिव्ह, अॅम्बिशन आणि स्टाइल या तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली जाईल. डॅशबोर्ड डिझाइन, 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि टू-स्पोक स्टीयरिंग व्हील हे वाहन अधिक प्रीमियम बनवते.

हेही वाचा: एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन, दररोज 2GB डेटा, Disney + Hotstar देखील

Web Title: Skoda Slavia Launch 28 February Check Price Engine And All The Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TechnologyautoAutomobile