टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा

टीम ई सकाळ 
Wednesday, 3 March 2021

०२२ मध्ये सॅटेलाईट इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणं शक्य होणार आहे. याबद्दलची तयारी इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स लवकरच सुरू करणार आहे. SpaceX ची सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा जिचं नाव Starlink आहे

नागपूर : Tesla कार भारतात लाँच केल्यानंतर आता इलॉन मस्क भारतात इंटरनेट सेवा उपल्बध करणार आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या Starlink कंपनीची इंटरनेट सेवा लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही इंटरनेट सेवा आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून मिळणार आहे. Starlink कंपनीनं यासाठी रजिस्ट्रेशन सुरु केले आहेत.  

२०२२ मध्ये सॅटेलाईट इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणं शक्य होणार आहे. याबद्दलची तयारी इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स लवकरच सुरू करणार आहे. SpaceX ची सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा जिचं नाव Starlink आहे ती भारतात प्री ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे. या इंटरनेट सर्व्हिसची किंमत ९९ डॉलर्स म्हणजेच सात हजार २७० रुपये इतकी आहे.  

WhatsApp मुळे तुमचा डाटा लवकर संपतो का? आता असा होणार नाही. आलंय हे फिचर 

सध्या ही इंटरनेट सर्व्हिस सिस्टम बीट-टेस्टिंग फेजमध्ये आहे. जर तुम्हालासुद्धा या इंटरनेट सर्व्हिसचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही starlink च्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवू शकता. मात्र सध्या भारतात starlink ची सर्व्हिस काही यूजर्ससाठी आणि काही क्षेत्रांमध्येच उपब्ध आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या पद्धतीनं इतर ऑर्डर पूर्ण केले जाणार आहेत असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. 

जर तुम्हालाही या इंटरनेट सर्व्हिसचा लाभ पाहिजे असेल तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या परिसरात ही सर्व्हिस उपलब्ध आहे का हे बघू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा पिनकोड आणि शहराचं नाव वेबसाईटवर टाईप करावं लागेल. तसंच तुम्ही दिलेली रक्कम ही रिफंडेबल असणार आहे. 

असं करा रजिस्ट्रेशन 

२०२२ पर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही मोजक्या यूजर्सना ही सर्व्हिस दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला वेबसाईटवर असलेल्या Order Now बटनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इन्फॉरमेशन रेडिरेक्ट पेजवर नेण्यात येईल. या पेजवर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, फोन नंबर, ई-मेल आयडी ही माहिती टाईप करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ९९ डॉलर्स भरण्यासाठी तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती द्यावी लागेल.  यामध्ये यूजर्सना ब्रॉडबँड कनेक्शन मिळणार नाहीत असं काम्पिकडून सांगण्यात आलंय.

गुगलवरून नको त्या गोष्टी सर्च केल्या तर तुमचा "...

ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि मेक्सिको या देशांमध्ये starlink इंटरनेट सर्व्हिसची सुरुवात तब्बल ४९९ डॉलर्स पासून करण्यात आली आहे. यामध्ये वायफाय राउटर, पॉवर सप्लाय, केबल आणि माउंटिंग ट्रायपॉड या वस्तू मिळणार आहेत. starlink च्या या सर्व्हिसमध्ये १ GBPS पर्यंत अपलोडींग आणि डाऊनलोडिंग स्पीड असणार आहे. सध्या आपल्याला १५० MBPS पर्यंत स्पीड मिळते जी दुप्पट होऊन ३०० MBPS पर्यंत जाऊ शकते.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Starlink company of Elon Musk will provide internet in India