Best Cooler: पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, ऑन करताच देईल बर्फासारखं थंड फिल; लगेच चेक करा खासियत l summer special cooler in budget price cheapest than fan know features | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Cooler under 1000

Best Cooler: पंख्यापेक्षाही स्वस्त कूलर, ऑन करताच देईल बर्फासारखं थंड फिल; लगेच चेक करा खासियत

Cooler : उन्हाळ्यात म्हटलं की कूलर आणि एसीची मागणी वाढते. जर तुम्हीही नवीन कुलर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका वेगळ्या प्रकारचे कुलर सांगणार आहोत.

या कूलरची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही ते सहज ऑर्डर करू शकता. चला तर आज आपण अशा कूलरबाबत जाणून घेऊयात जे खरेदी करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

NKL II036 LED डिझायनर स्पीड कूलर फॅनची खूप चर्चा आहे. यासोबतच तुम्हाला अशा अनेक फीचर्स देखील मिळतात ज्यामुळे ते युनिक बनते.

तसेच त्याची किंमत फक्त 527 रुपये आहे. यावर अनेक ऑफर्स सुरू आहे. तसेच हा कूलर अगदी पोर्टेबल आहे. तुम्ही हा कूलर कुठेही हलवू शकता.

Clairbell Mini Cooler

क्लेअरबेल मिनी कूलर त्याच्या डिझाईनमुळे चर्चेत राहतो. आपण ते टेबलवर देखील सहजपणे बसवू शकता. या कूलरची किंमत फक्त 799 रुपये आहे. तसेच तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता.

यामध्ये तुम्हाला फास्ट एअर फॅनचाही पर्याय देण्यात आला आहे. म्हणजे हवेच्या गुणवत्तेबद्दल तुम्हाला कोणतीही तक्रार असणार नाही. हे पोर्टेबल कूलर असले तरी, तुम्ही हवा आणि कूलिंगकडून जास्त अपेक्षा करू नये.

Best Cooler under 1000

Best Cooler under 1000

ZVR Mini Air Conditioner

तुम्ही Flipkart वरून ZVR मिनी पोर्टेबल USB एअर कंडिशनर ऑर्डर करू शकता. या एअर कूलरची एमआरपी रु.1,999 आहे आणि तुम्ही 75% डिस्काउंटनंतर तो रु. 499 मध्ये खरेदी करू शकता.

आज ऑर्डर दिल्यास ते 13 मार्चपर्यंत वितरित केले जाईल. या एअर कुलरचा आवाजही खूप कमी आहे. कारण त्यात एक छोटा एअर कुलिंग फॅन बसवण्यात आला आहे. त्याची रचनाही खूपच आकर्षक आहे. त्यामुळे त्याची मागणी नेहमीच जास्त असते. (Electronic Gadget)

Best USB Cooler

Best USB Cooler

वरील सगळे कूलर पोर्टेबल असून अगदी स्वस्त आणि सहज कुठेही हलवू शकणारे आहेत. तेव्हा तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यासाठी हे कूलर विकत घेऊ शकता. (Technology)