
प्रत्येक मध्यमवर्गीय (Middle Class) व्यक्तीचे हे स्वप्न असते की त्यांच्याकडे कार असली पाहिजे. आजकालच्या काळामध्ये हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँक आणि सर्व आर्थिक कंपन्या कार (Financial Company) कार लोनची सुविधा देत आहेत. त्यामुळे आजकाल कार खरेदी करण्यासाठी खूप लोकांसाठी खूप सोपे झाले आहे. पण मोटार वाहन कायद्यानुसार, कार खरेदी (Car Insurance) करताना त्याचा इन्शुरन्स घेणे (Buying Insurance) गरजेचे आहे.
कार इन्शुरन्स घेण्यासाठी ग्राहकांना कित्येक प्रकारचे फायदे मिळू शकतात. त्यामुळे कारमध्ये कोणत्याही प्रकारचे डॅमेज होण्याची स्थितीमध्ये लोकांसाठी नुकसान भरपाई मिळू शकते. कार इन्शुरन्स काही दिवासांनंतर रिन्यू करावा लागतो. अशावेळी तुम्ही आपल्या कार ची विमा रिन्यू करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून कार इन्शुरन्स रिन्यू करताना काही पैसे देखील वाचवू शकता. (Smart Tips to Renew Your Car Insurance)
कार इन्शुरन्स खरेदी करण्याआधी किंवा रिन्यू करण्याआधी तुम्हाला नवीन विमा कंपन्यांबाबात योग्य माहिती जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशामुळे तुम्ही कोणत्याही वीमा कंपनीमध्ये रिसर्च करू इश्चित असाल तर ऑनलाईन याबाबत माहिती मिळवू शकता. तीन-चार कंपन्यांना एकमेकांसोबत तुलना केल्यानंतर विमा खरेदी करा.
कोणताही विमा खरेदी करण्यासाठी त्याची एक्सपायरी डेट योग्य पध्दतीने तपासण्याची गरज असते. जर तुम्हाला विमा योग्यवेळी रिन्य केला नाही तर नंतर तुम्हाला जास्त प्रीमियन देऊ तो रिन्यू करावा लागेल. लक्षात ठेवा की, विमा एक्सपायर होण्याच्या कमीत कमी ७ दिवस आधी नवीन पॉलिसी घेण्याचा विचार करा
जर तुम्ही एका वर्षामध्ये इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारे क्लेम केले नसेल तर तुम्हा नंतर No Claim Bonus चा लाभ मिळू शकतो. पहिल्या वर्षात हा फायदा २० टक्क्यांपर्यंत मिळतो. लक्षात ठेवा की जर तुम्ही दरवर्षी ५००० प्रिमियमच्या स्वरुपामध्ये देत असेला तर No Claim Bonus म्हणून तुम्हाला १००० रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. दरवर्षी हा बोनसमध्ये वाढ होते.
कार इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानतंर मध्ये मध्ये छोटे -छोटे क्लेम करणे टाळा. छोट्या मोठ्या डॅमेजचा खर्च घेतल्यास तुम्हाला No Claim Bonusचा लाभ घेता येणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.