Royal Enfield चा स्वस्तातला रूबाब लवकरच अनुभवता येणार!

J1C1 ला रॉयल एनफील्ड हंटर म्हटले जात आहे
Royal Enfield
Royal EnfieldRoyal Enfield
Updated on

बाईक घेणं अनेकांचं स्वप्न असतं. त्यात रॉयल एनफील्ड असावी असं तर बाईकप्रेमींना वाटतंच. त्यांच्या अनेक बाईक्सवर (Bike) तरूणाई फिदा आहे. रॉयल एनफील्ड (Royal Enfield) आवडणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. यावर्षी रॉयल एनफिल्ड अनेक नवीन बाईक्स लॉंन्च करणार आहे. या लॉन्चमध्ये एक एंट्री लेव्हल मोटरसायकल आहे. ज्याचे कोड नाव J1C1 देण्यात आले आहे. रॉयल एनफिल्डच्या 350 सीसी सेगमेंटमधील ही बाईक सर्वात स्वस्त बाईक असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Royal Enfield
एवढीशी चिमणी पण, ३ सिहांना पडली भारी! सिंहांनी केलं असं काही...! Viral Video

J1C1 ला रॉयल एनफील्ड हंटर म्हटले जात आहे. ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि रॉयल एनफील्ड मेटिअर 350 ला पॉवर देणारे 350cc इंजिनसह येऊ शकते. या बाईकमध्ये क्लासिकचे अनेक घटक मिळू शकतात. रॉयल एनफिल्डच्या या बाईकलाआधुनिक रेट्रो मोटरसायकल म्हणून पेश केले जाईल.

Royal Enfield
Skin Tan होतेय! फिकर नॉट! उन्हाळात हे पाच घरगुती उपाय करा

असे आहेत फिचर्स

रिपोर्टनुसार या बाईकची किंमत १.३ लाख रूपये असण्याची शक्यता आहे. नवीन एंट्री-लेव्हलनुसार ही बाईक डिस्क ब्रेकसह सिंगल-चॅनल एबीएस प्रणालीसह सुसज्ज आहे. LED दिव्यांऐवजी J1C2 मध्ये हॅलोजन दिवे मिळू शकतात. तसेच या बाइकला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सिंगल सीट मिळण्याची अपेक्षा आहे.

इंजिन- रॉयल एनफील्डच्या इंजिनाबाबात कंपनीने ऑफिशियल माहिती दिलेली नाही. पण यात 346cc बरोबर एअरकूल, सिंगल सिलेंडर असू शकतो, असा अंदाज लावण्यात आला आहे. तसेच ही बाईक 19.4PS पॉवर आणि 28Nm पीक टॉर्क देते. तसेच या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले असून ते मागील चाकाला उर्जा देतात.

Royal Enfield
युक्रेनच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पडला रशियन टॅंकवर भारी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com