टाटाच्या 'या' कंपनीने सरकारला लावला 645 कोटींचा चुना; CAG अहवालात उघड

परवाना शुल्क आकारणी 950.25 कोटी रुपयांनी कमी झाली
Tata
Tata esakal

टाटा समुहाच्या टाटा कम्युनिकेशन मुळे केंद्र सरकारकारला 645 कोटी रूपयांचा तोटा झाला आहे.कॅगच्या अहवालात या घोटाळ्याचा खुलासा झाला आहे. सोमवारी प्रसिध्द केलेल्या अवहाला नुसार कंपनी ने 2006-07 पासुन ते 2017-18 याच्या दरम्यान एकूण महसूलाची माहिती दिली. त्यामुळे परवाना शुल्क आकारणीच्या बाबतीत शासनाला मनस्ताप सहन करावा लागला. कॅग ने सांगितल की टाटा कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनी पासून ही रक्कम वसूल करण्याची गरज आहे.

कॅगने म्हटले आहे की, "टीसीएल (TCL) कडून प्राप्त झालेल्या एनएलडी (NLD),आयएलडी( ILD) आणि आयएसपी-आयटी (ISP-IT) परवान्यांच्या संदर्भात ऑडिट केलेले AGR स्टेटमेंट ऑफ नफा-तोटा स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट आणि जीआर स्टेटमेंटची तपासाची छाननी केली आहे. ही छाननी 2006-07 ते 2017-18 या कालावधीतील विवरणासाठी करण्यात आली होती. यामध्ये कंपनीने एकूण महसूल 1,32,5281 कोटी रुपयांनी कमी केल्याचे उघड झाले आहे.

Tata
Technology: 5G लाँचच्या आधीच 6G ची तयारी सुरू! स्वदेशी असणार 6G टेक्नॉलॉजी

त्यामुळे परवाना शुल्क आकारणी 950.25 कोटी रुपयांनी कमी झाली आहे. कॅगच्या अहवालानुसार, दूरसंचार विभागाने (DoT) कंपनीकडून परवाना शुल्क म्हणून केवळ 305.25 कोटी रुपये जमा केले आहेत. अहवालानुसार, 'दूरसंचार विभागाच्या मूल्यांकनानुसार 305.25 कोटी रुपये परवाना शुल्क वजा करून, कंपनीनची 645 कोटींची थकबाकी आहे. ही रक्कम कंपनीकडून वसूल करण्यात यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com