Altroz iCNG : टाटाने केला धमाका! लाँच केली सीएनजी हॅचबॅक कार; मिळतायत जबरदस्त फीचर्स आणि सनरूफ

टाटाने या गाडीमध्ये ३० लीटर क्षमतेचे दोन सीएनजी टँक बसवले आहेत.
Tata Altroz iCNG
Tata Altroz iCNGEsakal

टाटा मोटर्सने आपली नवीन सीएनजी हॅचबॅक कार लाँच केली आहे. अल्ट्रॉझ आय सीएनजी असं या कारचं नाव आहे. टाटाच्या या गाडीला लोक मारूती बलेनो सीएनजी आणि टोयोटा ग्लान्झा सीएनजी या गाड्यांशी कम्पेअर करत आहेत. या कारमध्ये कित्येक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध

टाटाने अल्ट्रॉझ आय सीएनजीला सहा वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध केलं आहे. यामध्ये एक्सई, एक्स एम+, एक्स एम+ (एस), एक्सझी, एक्सझी+ (एस) आणि एक्सझी+ (ओ) असे हे व्हेरियंट आहेत. अल्ट्रॉझचे सीएनजी मॉडेल हे दिसायला बऱ्याच अंशी याच गाडीच्या पेट्रोल व्हेरियंट प्रमाणेच आहे.

ही गाडी ओपेरा ब्लू, डाऊनटाऊन रेड, आर्केड ग्रे आणि अव्हेन्यू व्हाईट अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, यावर तीन वर्षं किंवा एक लाख किलोमीटर पर्यंतची वॉरंटी देण्यात येत आहे.

काय आहेत फीचर्स

टाटाने या गाडीमध्ये पहिल्यांदाच ३० लीटर क्षमतेचे दोन सीएनजी टँक बसवले आहेत. हे सिलेंडर बूट फ्लोअरच्या खाली असल्यामुळे कारमध्ये भरपूर बूट स्पेस मिळते. गाडीच्या आतमध्ये एक सात इंचांची टचस्क्रीन पॅनल मिळते. याला अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटी मिळते. सोबतच, एअर प्युरीफायर, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि इतर अनेक फीचर्स मिळतात.

Tata Altroz iCNG
Best CNG Cars : कार खरेदी करताय? या आहेत भारतातल्या टॉप CNG मॉडेल्स अन् तेही 8 लाखात... 

"सीएनजी कारबाबत विचार करताना लोकांना वाटतं की कारमधील बूट स्पेस कमी होणार. मात्र, अल्ट्रॉझच्या बाबतीत तसं होणार नाही. ड्युअल सिलेंडर सेटअपमुळे या कारमध्ये भरपूर बूटस्पेस उपलब्ध होते." असं टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्रा यांनी सांगितलं.

सनरूफही मिळणार

अल्ट्रॉझच्या सीएनजी व्हेरियंटमध्ये एक व्हॉइस अ‍ॅक्टिव्हेटेड, सिंगल-पेन सनरूफही देण्यात येत आहे. अल्ट्रॉझ सीएनजीच्या एक्सएम+ (एस), एक्सझी+ (एस) आणि एक्सझी+ ओ (एस) या व्हेरियंट्समध्ये सनरुफ उपलब्ध असणार आहे.

Tata Altroz iCNG
Cars Under 10 Lakh: कार घेण्याचा विचार करताय?पाहा स्वस्त अन् मस्त पर्याय

सीएनजी मोडमध्ये होणार सुरू

अल्ट्रॉझ सीएनजी कारमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच, यात ५-स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. बलेनो सीएनजी किंवा ग्लान्झा सीएनजी या गाड्या थेट सीएनजी मोडमध्ये असताना सुरू होत नाहीत. मात्र, टाटाची ही गाडी थेट सीएनजी मोडमध्ये असताना सुरू होऊ शकते.

किती आहे किंमत?

अल्ट्रॉझ सीएनजीची एक्स शोरूम बेस प्राईज ही ७.५५ लाख रुपये आहे. याच सेगमेंटमध्ये येणाऱ्या बलेनो किंवा ग्लान्झाच्या तुलनेत ही किंमत कमी असल्यामुळे ग्राहक या कारला अधिक पसंती देतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Tata Altroz iCNG
Electric Cars : भारतातील सर्वात स्वस्त टॉप ५ इलेक्ट्रिक कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com