Tata Cars: टाटाच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट, खूपच स्वस्तात घेऊन जा घरी; पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Cars

Tata Cars: टाटाच्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट, खूपच स्वस्तात घेऊन जा घरी; पाहा डिटेल्स

Discount on Tata Motors Cars: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी Tata Motors च्या गाड्यांना ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. नवीन वर्षाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून देखील शानदार ऑफरची घोषणा केली जात आहे. जानेवारी महिन्यात कंपनीच्या कार्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Upcoming Phone: कन्फर्म! या तारखेला येतोय Samsung चा सर्वात पॉवरफुल फोन, मिळेल 200MP कॅमेरा

Tata Tiago

Tata Tiago

Tata Tiago

Tata Tiago वर ४० हजार रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. कारमध्ये स्वेप्टबॅक हेडलाइट्स, मस्क्यूलर बोनट आणि १५ इंच एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. ५ सीटर कारमध्ये ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ७.०-इंच इंफोटेमेंट सिस्टम, ड्यूल एयरबॅग, ABS आणि EBD सारखे फीचर्स मिळतील.

कारमध्ये १.२ लीटर, ३ सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ८५ एचपी पॉवर आणि ११३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. गाडीची एक्स-शोरूम किंमत ५.४५ लाख रुपये आहे.

Tata Tigor

जानेवारी महिन्यात Tata Tigor ला ४५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. कारमध्ये स्वेप्ट-बॅक प्रोजेक्टर हेडलाइट्स, स्लोपिंग रूफलाइन, १५-इंच ड्यूल-टोन एलॉय व्हील्स आणि रॅप-अराउंड क्लियर-टाइप LED टेललॅंप्स मिळतात. तसेच, फ्लॅट-बॉटम मल्टीफंक्शनल स्टेअरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि रियर-व्ह्यू कॅमेरा सारखे फीचर्स मिळतील.

Tata Tigor मध्ये देखील १.२ लीटर, ३ सिलेंडर रेवोट्रॉन इंजिन देण्यात आले आहे. कारची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत ६.१ लाख रुपये आहे.

हेही वाचा: Smartwatch: आता घड्याळावरूनच करा थेट कॉल, कमी बजेटमध्ये Fire-Boltt ची शानदार स्मार्टवॉच लाँच

Tata Harrier

Tata Harrier

Tata Harrier

Tata Harrier ६५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. यात मोठे ग्रिल, प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि १८ इंच एलॉय व्हील्स देण्यात आले आहे. इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर एसयूव्हीच्या कॅबिनमध्ये व्हेंटीलेटेड सीट्स, एअर प्यूरीफायरसह ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, मल्टीपल ड्राइव्हिंग मोड, ८.८-इंच इंफोटेनमेंट कंसोल, ६ एयरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलचा समावेश आहे.

Tata Harrier मध्ये २.० लीटर क्रायोटेक टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १६८ एचपी पॉवर आणि ३५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कारची एक्स-शोरुम किंमत १४.८ लाख रुपयांपासून सुरू होते.

Tata Safari

Tata Safari जानेवारी २०२३ मध्ये ६५ हजारांच्या डिस्काउंटसह मिळत आहे. कारमध्ये माउंटेड हेडलाइट्स, क्रोम ग्रिल, रूफ रेल्स, ड्यूल-टोन एलॉय व्हील्स आणि रॅप-अराउंड LED टेललाइट्स मिळेल. ही कार ६-सीटर आणि ७-सीटर पर्यायासह येते. एसयूव्हीच्या कॅबिनमध्ये लेदर सीट्स, पावर्ड फ्रंट सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, अँम्बिएंट लाइटिंग आणि मल्टीपल एयरबॅग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टाटा सफारी एसूव्हीमध्ये २.० लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. गाडीची एक्स-शोरूम किंमत १५.४५ लाख रुपये आहे.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर