ब्राउजरवर नव्हे तर थेट तुमच्या लॅपटॉपवर चालेल ChatGPTचा हा नवा पर्याय

ChatGPT सारखीच एखादी AI सिस्टिम जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर बिना ब्राउजर वापरण्याची इच्छा असेल तर यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे
लॅपटाॅपवर चालेल चॅट ChatGPT
लॅपटाॅपवर चालेल चॅट ChatGPTEsakal

OpenAI चं ChatGPT आल्यापासून सगळीकडचे ते चांगलंच चर्चेत आलं आहे. ChatGPT चा बोलबाला एवढा वाढला आहे की आता त्याचे पर्यायी प्लॅटफॉर्म आणि अॅप्स तयार होवू लागले आहेत. ChatGPT सध्या तरी तुम्ही ब्राउजरवरचं वापरू शकता. Technology News Marathi chatgpt option run directly laptop not browser teach yourself

मात्र ChatGPT सारखीच एखादी AI सिस्टिम जर तुम्हाला तुमच्या लॅपटॉपवर बिना ब्राउजर वापरण्याची इच्छा असेल तर यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी तुम्हाला GPT4ALL नावाचं एक अॅप App इंस्टॉल करावं लागेल. हे अॅप कोणत्याही मॅक, विंडोज आणि लाइनेक्स बेस्ड कम्प्युटरवर सहज चालू शकतं. chatgpt alternative

GPT4ALL हे अॅप नोमिक AI या कंपनीच्या प्रोग्रामर्सनी तयार केलं आहे. यामध्ये ChatGPT चे सर्व फिचर्स उपलब्ध नसले तरी चॅटजीपीटीच्या तुलनेत तुम्हाला अधिक पर्सनलाइज्ड अनुभव देऊ शकतं.  मात्र यासाठी तुमचा कम्प्युटर किंवा लॅपटॉप हा २०१५ नंतरचा असणं गरजेचं आहे. त्यात ८ जीबी रॅम 8GB RAM असणं आवश्यक आहे आणि कमीत कमी ४ जीबी स्टोरेज गरजेचं आहे. artificial Intelligence

कम्प्युटरवर AI चालवणं

GPT4ALL च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हे एक लोकली चालणारं AI चॅट अॅप्लिकेशन आहे जे तुमच्या कम्प्युटरच्या सीपीयी CPUच्या आधारे चालतं. हे चालण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची देखील आवश्यकता नाही. शिवाय हे तुमचा चॅट डेटा इतर बाहेरच्या सर्वरवर पाठवत नाही. 

वेबसाईटनुसार जोवर तुम्ही परवानगी देत नाही तोर तुमचा डेटा सर्वरवर पाठवला जात नाही. तुमच्या परवानगीनेच चॅट डेटा GPT4ALL या मॉडलला आणखीन उत्तम बनवण्यासाठी सर्वरवर पाठवला जाऊ शकतो. 

याचाच अर्थ तुम्ही जे काही प्रश्न विचाराल ते सर्व खासगी राहतील. हे अॅप तुमचा डेटा OpenAI किंवा तिच्या मूळ कंपनीला किंवा ChatGPT सारख्या बाह्य सर्व्हरला पाठवणार नाही. खरं तर डेटा प्रायव्हसी हा सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधीत अशी समस्या किंवा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अद्याप OpenAI, Google आणि Meta सारख्या कंपन्यांना देखील सापडलेलं नाही.

हे देखिल वाचा-

लॅपटाॅपवर चालेल चॅट ChatGPT
Chat GPT : सगळं जमलं, पण UPSC Pre पास होणं हे Chat GPT च्या तोंडचाही घास नाही!

GPT4ALL मधील त्रुटी

GPT4ALL हे इंटरनेटवर चालणाऱ्या इतर GPT मॉडल्सप्रमाणे पावरफुल नाही. कारण इंटरनेटवर चालणारे मॉडल्स हे त्यांचा डेटा एखाद्या मोठ्या सर्वरवर पाठवत असतात शिवाय ते वेळो वेळी अपग्रेड होत असतात. GPT4All तुम्ही फार फार तर एक पर्सनलाइज्ड AI असिस्टंट म्हणून विकसित करू शकता. त्याला चांगल्या प्रकारे केवळ  ट्रेन करणं तुमच्या हातात आहे. 

कम्प्यूटर वर GPT4All कसं इंस्टॉल कराल?

हे अॅप तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अगदी सहज इंस्टॉल करू शकता. जसे इतर अॅप इन्स्टॉल केले जातात अगदी त्याचप्रमाणे GPT4All इन्स्टॉल करणं शक्य आहे. यासाठी तुम्हाला GPT4All च्या ऑपिशियल वेबसाईटवर जावं लागेल. जिथं तुम्हाला तीन टॅब दिसतील. ज्यात मॅक, विंडोज आणि लाइनेस्क यापैकी एकाची निवड करून तुम्ही अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. 

नॉमिक AI ही एक नवी कंपनी असल्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती करून घ्या. ChatGPT ची लोकप्रियता वाढत गेल्याने त्याच्या नावाचा फायदा घेत इतर इतर अनेक मालवेअर पाय पसरु लागले आहेत. ChatGPT चे फिचर्स देण्याचा दावा करणारं कोणतंही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती तपासा. नाहीतर तुमचं डिव्हाइस आणि त्याचसोबतच तुमचा डेटा धोक्यात येऊ शकतो. 

chatgpt option run directly laptop not browser teach yourself

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com