Messaging Apps Banned : भारत सरकारनं घातली या १४ मेसेजिंग ॲप्सवर बंदी

केंद्रातील मोदी सरकारने मेसेजिंग अॅप्सबाबत मोठा निर्णय
Messaging Apps Banned
Messaging Apps Banned esakal

Messaging Apps Banned : केंद्रातील मोदी सरकारने मेसेजिंग अॅप्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दहशतवादी कारवायांच्या आरोपामुळे केंद्र सरकारने 14 मोबाईल मेसेजिंग अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली आहे.

Messaging Apps Banned
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अॅप्स दहशतवादी वापरत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरेकी या अॅप्सच्या माध्यमातून इतर अतिरेक्यांपर्यंत आपला संदेश पोहोचवत होते आणि त्यांच्यावर पाकिस्तानकडूनच संदेश येत होते.

Messaging Apps Banned
Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

सुरक्षा दल, गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या शिफारशीवरून सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे त्यात बीचॅट, नंदबॉक्स, आयएमओ, एलिमेंट, सेकंड लाइन, जंगी, थ्रीमा, एनिग्मा, मीडिया फायर आणि ब्रायर यांचा समावेश आहे.

Messaging Apps Banned
Motorola Moto G : स्मार्टफोनचा बाप परत आला ! मोटोरोलाने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन

माहिती तंत्रज्ञान कायदा, 2020 च्या कलम 69A अंतर्गत या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तर नेमके कोणते ॲप्स या यादीत आहे ते सर्व जाणून घेऊ. मेसेजिंग ॲप्सची नाव तसंच त्यांच्या संबधित सर्व माहिती जाणून घेऊ...

Messaging Apps Banned
Moto G32 चा नवीन व्हेरिएंट 22 मार्चला होणार भारतात लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफीकेशन्स

Crypviser आणि Enigma

Crypviser’ Secure Messenger हे एक सर्वात खाजगी मेसेजिंग ॲप असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित हे ॲपही भारत सरकारने ब्लॉक केलं आहे. याशिवाय Enigma ॲपही पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा कंपनी करते, या ॲपच्या ग्रुपमध्ये १००,००० सदस्य असू शकतात आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स तसेच ग्रुप्समध्ये सपोर्ट करतात.

Messaging Apps Banned
Tata Harrier : टाटा हॅरियर फेसलिफ्टबद्दल 5 खास गोष्टी, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत

Safeswiss आणि Wickr Me: An Amazon-backed app

Safeswiss हे स्वित्झर्लंड बेस्ड अॅपचा देखील दावा असा आहे की हे अॅप सर्वात व्यापक, डिव्हाइस-टू-डिव्हाइस, मिलिटरी-ग्रेड, रीअल-टाइम एनक्रिप्शनद्वारे संरक्षित केलं गेलेलं आहे. पण यातही भारत सरकारला दोष आढळल्याने हे बॅन केलं गेलं आहे. याशिवाय Wickr Me: An Amazon-backed app हे अॅप अॅमेझॉनने 2021 मध्ये विकत घेतले होते परंतु डिसेंबर 2023 मध्ये ते बंद होत आहे.

Messaging Apps Banned
Tata Group: टाटा ग्रुपची 'ही' कंपनी घेणार 10 हजार कोटींचे कर्ज! जाणून घ्या काय आहे योजना

MediaFire आणि Briar

MediaFire हे एक अधिक स्टोरेज ऑफर करणारं अॅप आहे.जे युजर्सना फोटो, व्हिडिओ, संगीत आणि डॉक्यूमेंट्स अपलोड करण्यास मदत करते. त्यानंतर वापरकर्ते फोन, टॅबलेट, संगणक किंवा वेबसह कुठूनही अॅपमध्ये प्रवेश करू शकतात. तसंच Briar: Available only on Play Store हे सर्व पीअर-टू-पीअर एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप आहे. वापरकर्ते जवळच्या संपर्कांशी याद्वारे थेट कनेक्ट होऊ शकतात. हे दोन्ही अॅप्सही बॅन आहेत.

Messaging Apps Banned
SUV launch : यंदा बाजारात येणार तीन नव्या एसयूव्ही

BChat आणि Nandbox Messenger

BChat हे बेलडेक्स ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानावर आधीरित अॅप असून एक दमदार मेसेजिंग प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करते. तसंच Nandbox Messenger या अॅपवर युजर एकाच खात्यातून अनेक प्रोफाइल तयार करू शकतात. हे दोन्ही अॅप्सही बॅन केले गेले आहेत.

Messaging Apps Banned
Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Conion आणि IMO

Conion हे एक असं अॅप आहे, जिथे याचा वापर करण्यासाठी फोन नंबर किंवा ईमेल पत्ता आवश्यक नाही. तुम्ही पूर्ण अनोळखीपद्धतीने Conion वापरु शकता. असा कंपनीचा दावा आहे. तसंच IMO हे Play Store आणि App Store वर एक लोकप्रिय अॅप जे वापरकर्त्यांना विनामूल्य व्हिडिओ कॉल आणि त्वरित संदेशांना अनुमती देते. पण हे दोन्ही अॅप्सही बॅन आहेत.

Messaging Apps Banned
Banana Eating Tips : केळी खाल्ल्यानंतर या गोष्टी कधीच खायच्या नाहीत, पण का?

Element आणि 2nd Line

Element हे अॅप विविध टीम्समध्ये संभाषणासाठी अधिक उपयुक्त असून मॅट्रिक्स नावाच्या ओपन नेटवर्कवर तयार केले आहे. तसच 2nd Line हे अॅप तुमच्या फोनला अतिरिक्त लाइन प्रदान करण्यासाठी मोबाइल डेटा किंवा वायफाय कनेक्शन वापरते.यासाठी फक्त अॅप डाउनलोड करा, फोन नंबर निवडा आणि तुमच्या फोनवरील अतिरिक्त लाइनवरून अमर्यादित कॉलिंग आणि मजकूर पाठवणे त्वरित ऍक्सेस हे सारं वापरु शकता.

Messaging Apps Banned
Diet Tips : सफरचंद खाल्ल्यानंतर मुळीच खाऊ नयेत या गोष्टी

Zangi Messenger आणि Threema

Zangi Messenger देखील युजर्सना फोन नंबरशिवाय आणि वैयक्तिक माहिती शेअर केल्याशिवाय नोंदणी करण्याची परवानगी देते. तर Threema हे अॅप पूर्णपणे Unknown बनून वापरले जाऊ शकते. यामुळेच या दोन्ही अॅप्सवरही बंदी टाकण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com