
नवी दिल्ली - टेलिकॉम कंपन्या पुढच्या काही महिन्यांमध्ये टारीफ प्लॅनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे आता ग्राहकांना मोबाइलवर बोलणं आणि इंटरनेटचं बिल वाढू शकतं. टेलिकॉम कंपन्या 1 एप्रिलपासून दर वाढवण्याची तयारी करत आहेत. इन्व्हेस्टमेंट इन्फर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या रिपोर्टनुसार, येत्या 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महसूल वाढवण्यासाठी कंपन्या पुन्हा एकदा टॅरिफमध्ये वाढ करू शकतात. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदा कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केली होती.
टॅरिफमध्ये वाढ आणि ग्राहकांना 2 जी मधून 4जी अपग्रेडेशनमुळे अॅवरेज रिव्हेन्यू पर युजरमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. मीडियम टर्ममध्ये हे जवळपास 220 रुपये असू शकतं. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, पुढच्या दोन वर्षात इंडस्ट्रीचं उत्पन्न 11 ते 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास 38 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
आय़सीआरएनं त्यांच्या आऊटलूक रिपोर्टमध्ये सांगितलं की, सध्या हे क्षेत्र इनफ्लेशन पॉइंटच्या दिशेनं जात आहे. यात वाढीचा पुढचा टप्पा बिगर टेल्को व्यवसायांकडून चालवणे हा आहे. यामध्ये एटरप्रायजेस बिझनेस, क्लाउड सर्व्हिस, डिजिटल सर्व्हिस आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सर्व्हिसेसचा समावेश आहे.
कोरोनाच्या काळात टेलिकॉम इंडस्ट्रीवर फारसा परिणाम झाला नाही. लॉकड़ाऊनमध्ये डाटा वापर आणि टॅरिफमध्ये वाढ झाल्यानं सध्या या सेक्टरमध्ये सुधारणा झाली आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लास यामुळे डेटाचा वापर वाढला.
टेलिकॉम कंपन्यांवर एकूण अॅडजेस्टेड ग्रॉस रिव्हेन्यूची थकीत बाकी 1 लाख 69 हजार कोटी रुपये आहे. आतापर्यंत फक्त 15 टेलिकॉम कंपन्यांनी 30 हजार 254 कोटी रुपयांची परतफेड केली आहे. एअरटेलवर जवळपास 25 हजार 976 कोटी रुपये, वोडाफोन आयडियावर 50 हजार 399 कोटी तर टाटा टेलिसर्विसेसवर जवळपास 16 हजार 798 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कंपन्यांना यापैकी 10 टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात आणि उर्वरित रक्कम पुढच्या वर्षांमध्ये द्यायची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.