

Telegram Founder in Trouble? Russia Accuses Pavel Durov of Aiding Terrorism – What Really Happened
eSakal
Telegram CEO News: जगभरात लोकप्रिय असलेल्या मेसेजिंग अॅप Telegram चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल ड्युरॉव्ह यांच्याविरोधात रशियाने मोठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने ड्युरॉव्ह यांच्यावर दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला असून त्यांना aअटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले. ड्युरॉव्ह यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत हा खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे.