टेलिग्राम वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे? CEO नी केली मोठी घोषणा

टीम ई सकाळ
Thursday, 24 December 2020

व्हॉटसअ‍ॅपच्या तुलनेत टेलिग्रामवर प्रायव्हसीसाठी खास फीचर्स आहेत. मात्र आता या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. कारण टेलिग्राम चालवण्यासाठी कंपनीला पैशांची गरज आहे.

नवी दिल्ली - सध्या टेलिग्रामचा वापरही व्हॉटसअ‍ॅप प्रमाणेच केला जात आहे. मेसेजिंगसाठी हे लोकप्रिय असं अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपच्या तुलनेत टेलिग्रामवर प्रायव्हसीसाठी खास फीचर्स आहेत. मात्र आता या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागू शकतात. कारण टेलिग्राम चालवण्यासाठी कंपनीला पैशांची गरज आहे. 

टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ Pavel Durov यांनी सांगितलं की, बिझनेस सुरु ठेवण्यासाठी त्यांना 2021 मध्ये रिव्हेन्यू मिळवणं गरजेचं आहे. कंपनीचा खर्च चालवण्यासाठी त्यांनी पर्सनल सेव्हिंगही खर्च केलं आहे. मात्र या युजर्सच्या संख्येत वाढ होत असून यामुळे कंपनीला आणखी फंडिंगची गरज असेल. 

हे वाचा - गुगलचं शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर पाऊल; दोन भारतीय अ‍ॅप्समध्ये गुंतवले कोट्यवधी

जगभरात टेलिग्रामचे जवळपास 500 मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.  टेलिग्राम पुढच्या वर्षी रिव्हेन्यू जनरेट करेल. आम्ही 7 वर्षाच्या कालावधीत ठरलेल्या मूल्यानुसार काम करू. युजर्सना हा बदल लक्षात येणार नाही. टेलिग्राम अ‍ॅपचे फीचर्स यापुढेही फ्री राहतील. त्यावर कोणत्याही प्रकारे एक्स्ट्रा चार्ज लावला जाणार नाही. तसंच वन ऑन वन चॅटसुद्धा अ‍ॅड फ्री असतील. 

कंपनी अ‍ॅपमध्ये नवीन फीचर्स अ‍ॅड करणार आहे. नवीन फीचर्स ही बिझनेस टीम आणि पॉवर युजर्ससाठी असतील. यातील काही फीचर्स प्रीमियम असणार आहेत आणि यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागतील. पॉवर युजर्ससाठी काही पेड फीचर्स येऊ शकतात. कंपनीने हे स्पष्ट सांगितलं आहे की, रेग्युलर युजर्स टेलिग्राम फ्री वापरू शकतात. 

हे वाचा - तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे गुगलला कशी मिळतात? जाणून घ्या सविस्तर

टेलिग्राम गेल्या काही काळापासून भारतात लोकप्रिय झालं आहे. विशेषत: चित्रपट आणि वेब सिरीज डाउनलोड करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. टेलिग्रामने गुरुवारी सांगितलं की, एसडी कार्ड स्टोरेज सेटिंग, अँड्रॉइड अ‍ॅपसाठी नवीन युआय अ‍ॅनिमेशनसह कंपनी 12 नवीन अपडेट जारी करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telegram to launch pay services from 2021 soon