Word Cross : जगातील पहिलं शब्दकोडं प्रसिद्ध करणारा ‘आर्थर विन’

मेंदूला ‘खुराक’असणाऱ्या आणि जवळपास रोज उपलब्ध असलेल्या एका खेळाची गोष्ट ते म्हणजे ‘शब्दकोडे’
Arthur Winn
Arthur Winnesakal
Summary

जगातील पहिलं शब्दकोडं ‘आर्थर विन’ (Arthur Winn) यांनी १९१३ ला आजच्याच दिवशी न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात ‘वर्डक्रॉस’ या नावानं प्रसिद्ध केलं होतं.

निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम (Exercise) करावा लागतो. तसं मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी त्याचेही वेगवेगळे व्यायाम करावे लागतात थोडक्यात ‘ब्रेन जिम’ (Brain Gym). शारिरीक व्यायामात जसे बायसेप्स-चेस्ट-बॅक यांच्यासाठी वेगवेगळे व्यायाम येतात, तसे मेंदूच्या मशागतीतही त्याचा विशिष्ट भाग टार्गेट ठेवावा लागतो. त्यासाठी स्ट्रेचिंगसोबतच क्रॉस क्राऊल-ब्रेन बटन्स-हूक अप्स असे वेगवेगळे व्यायाम येतात. चांगल्या शरीरासाठी प्रथिन-जीवनसत्व-कर्बोदक यांचा मेळ लागतो तसाच मेंदूच्या बाबतीतही होतं. चपळ शरीरासाठी जिम व्यतिरिक्त रॅपलिंग-हायकिंग-स्वीमिंग अशा ॲक्टिव्हिटीज (Activities)असतात. तशा मेंदूसाठीही असतात. यात अगदी बुद्धीबळापासून प्रश्नोत्तरांपर्यंत आणि रुबिक क्यूब सोडवण्यापासून ते सुडोकूपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो.

Arthur Winn
Edwin Howard Armstrong : कहाणी रेडिओ तयार करणाऱ्या अवलियाची...

गमतीजमतीचा भाग किंवा टाईमपासपलिकडे अशा गोष्टी ठरवून केल्या किंवा दिवसातून ठराविक वेळ त्यासाठी दिला तर मेंदू थकत नाही. नविन विचारांना चालना मिळते-फ्रेश वाटतं. आज अश्याच पद्धतीच्या मेंदूला ‘खुराक’असणाऱ्या आणि जवळपास रोज उपलब्ध असलेल्या एका खेळाची गोष्ट सांगतो ते म्हणजे ‘शब्दकोडे’ (Crossword puzzles). शब्दकोड्याच्या प्रचलित प्रकारात एका मोठ्या चौकोनात काही पोकळ आणि काही भरीव काळे लहान चौकोन काढून त्यातल्या पोकळ चौकोनात शब्दाची समर्पक अक्षरे बसवून ती आडवी किंवा उभी कशीही वाचली तरी नेमका-अचूक-अर्थवाही शब्द तयार व्हावा अशी अपेक्षा असते.

वाचकाला योग्य शब्द (Words) सुचविण्यासाठी आडव्या आणि उभ्या रकान्यांतील शब्दाचे अर्थ सूचक यादीत दिलेले असतात. एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात त्यांतला योग्य-समर्पक शब्द निवडून तो चौकोनाच्या आडव्या अन् उभ्या ओळीत नेमका बसवावा लागतो. यासाठी योग्य शब्दाबरोबरच त्या शब्दासाठी जेवढे पोकळ चौकोन योजलेले असतील तितकीच अक्षरं असलेल्या शब्दाची निवड करावी लागते. शब्दकोडी सोडवण्याच्या छंदामुळे जशी वाचकाच्या शब्दसंपत्तीत भर पडते तशी त्याच्या शब्दसंग्रहाची व शब्दज्ञानाची कसोटीही पाहिली जाते. शब्दकोड्यांची मूळ सुरूवात इंग्रजी भाषेत झालेली असली तरी आता ती अनेक भारतीय भाषांतही लोकप्रिय झालीये.

Arthur Winn
जगाला बास्किन रॉबिन्स देणारा आईस्क्रीम निर्माता 'आयर्विन रॉबिन्स' यांची कहाणी

काही शब्दकोडे ही ठराविक विषयाला वाहिलेलीही असतात उदा. सिनेमा-साहित्य-विज्ञान यामुळं करमणुकीसोबतच त्या त्या विषयात ज्ञानसंवर्धनही होतं. काही भाषांत आडव्या आणि उभ्या अक्षरांची कोडी निर्माण करता येत नसल्यानं अशा भाषांत चक्क कोडी बनवता येत नाही उदा.चिनी भाषा. असे काही अपवाद वगळल्यास जगातील सर्व भाषांतून शब्दकोड्यांचे अनेकविध प्रकार प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. फ्रेंच भाषा (French language) ही शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर अशी भाषा आहे. कॅनडामध्ये आडवे किंवा उभे फ्रेंच आणि इंग्रजी शब्द योजून तयार केलेले द्विभाषिक कोडे लोकप्रिय झालेले आहेत. रशियात तर शब्दकोड्यांचा उपयोग प्रचारासाठीही करण्यात येतो.

चौकोनांची कोडी अधिक प्रमाणात प्रचलित असली तरी चित्रचौकटी-साम्यकारी-अनियमित आकाराची आणि ज्यांना शास्त्रिय किंवा गुप्त लेखनाची म्हणता येतील, अशी तत्कालिक विषयांवर आधारलेली वर्तुळाकार-बदामाच्या आकाराची-फुलीच्या खुणेच्या आकाराची असे कोड्यांचे अनेक प्रकार आढळून येत असले तरी पोकळ व भरीव छोटे चौकोन असलेल्या ‘चौरस’आकाराची कोडी जगभरात अधिक लोकप्रिय आहेत.

Arthur Winn
टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी

प्रसिद्ध विधानं वा अवतरणं देऊन त्यांचं लेखन ओळखायला सांगणं-काही शब्दांतील सोडलेली अक्षरं भरणं-एका शब्दातील अक्षरं फिरवून अनेक नवीन शब्द तयार करणं अश्या कल्पनांवर आधारलेले शब्दकोड्यांचे अनेक प्रकार रूढ आहेत. आताशा तर अनेक संगणकीय खेळांमध्येही विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो. शब्दकोडी हे आपलं संज्ञानात्मक आकलन वाढवतं त्यामुळं एखादा विषय समजावून घेतांना आपला पाया पक्का होण्यासाठी त्याची मदत होते.

शब्दसंग्रह वाढणं-व्याकरण सुधारणं यासोबतच योग्य शब्दांचा निवाडा करणं-थोडक्यात आपलं म्हणणं मांडता येणं-आपली मांडणी सुस्पष्टपणे समजावता येणं असे अनेक फायदे शब्दकोडी नियमित सोडवल्यामुळं होतात. अश्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमुळं मेंदूतल्या पेशींना सातत्यानं चालना मिळाल्यानं डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंश आणि उतारवयातील अल्झायमर (Alzheimers) या आजारांना लांब ठेवण्यास बऱ्यापैकी मदत होते अन् झालेच तरीही त्याची तीव्रता कितीतरी कमी करता येते. या व्यतिरिक्त एकत्र कोडी सोडवल्यानं परस्परसंबंध सुधारणं-मूड चांगला राहणं-मेंदूला ठरवून आणि नियमित चालना दिल्यानं त्याची कार्यक्षमता वाढणं असे अनेक फायदे या छोट्याश्या शब्दकोड्याचे आहेत.

शब्दप्रभुत्त्वावर आणि शब्दचातुर्यावर आधारित असलेला हा रंजनप्रकार जितका सहज वाटतो तितकेच सहजपणे त्याचे अनेक फायदेही आपल्याला होतात. जसं “ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे” असं आपण म्हणतो तसं “अ क्रॉसवर्ड इन अ डे कॅन कीप्स सायकॅट्रिस्ट अवे” असंही आपण म्हणू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com