...म्हणून लोकप्रिय फाईल शेअरिंग कंपनी 'वी ट्रान्सफर'वर झालंय बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

 कोरोनामुळे तुम्ही सध्या वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमच्या वर्क फाईल वी ट्रान्सफरने तुमचे सहकारी किंवा ऑफिसपर्यंत पोहोचत नसतील तर ती नेटवर्कची समस्या आहे असे समजू नका.

मुंबई : कोरोनामुळे तुम्ही सध्या वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमच्या वर्क फाईल वी ट्रान्सफरने तुमचे सहकारी किंवा ऑफिसपर्यंत पोहोचत नसतील तर ती नेटवर्कची समस्या आहे असे समजू नका. कारण दूरसंचार विभागाने (We Transfer)  वी ट्रान्सफरवर बंदी घातली आहे. हो हे खरे आहे. जगातील सर्वात लोकप्रिय डिजिटल फाईल ट्रान्सफर सेवेवर सरकारने १८ मे रोजी आदेश जारी करत बंदी घातली आहे. इंटरनेट सेवा पुरवठादारांनी वी ट्रान्सफरची दोन विशिष्ट पेजेस आणि संपूर्ण वेबसाइटवर बंदी घालण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

18 मे रोजी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन अर्थात डॉटने हे आदेश दिलेत. दरम्यान भारतात आमची सेवा बंद केल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. आमची टिम या संदर्भात अधिक माहिती घेत आहे. अशी प्रतिक्रीया वी ट्रान्स्फरच्या ट्विटर अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

बाप रे! मुंबईत बसून पाकिस्तानला देत होता भारतीय लष्कराची माहिती: संशयिताला गुप्तचर विभागानं घेतलं ताब्यात...  

वी ट्रान्स्फर : 

नेदरलँडची कंपनी असलेल्या ‘वी ट्रान्सफर’ चे जगभरात सुमारे 50 कोटी ग्राहक आहेत. एका महिन्यात काही अब्ज फाईल्स या सेवेद्वारे पाठवल्या जातात. एका ग्राहकाला 2 जीबी पर्यंतची फाईल विनामुल्य पाठवण्याची मुभा आहे. यासाठी कुठलेही अकाऊंट उघडण्याची आवश्यकता नाही. मात्र मोठ्या प्रमाणात फाईल पाठवायच्या असतील तर कंपनीचा प्रिमीयम प्लॅन विकत घ्यावा लागतो. 

अनेक वेबसाईटवर बंदी 

मात्र फाईल ट्रान्सफर करणाऱ्या वेबसाईटवर बंदीची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी 2011 मध्ये मेगाअपलोड नावाची वेबसाईट अशाच रितीने बंद करण्यात आली होती. या वेबसाईवर एका हिंदी चित्रपटाची पायरेटेट वर्जन अपलोड केल्यानंतर ही बंदी घालण्यात आली.

यापुर्वी गूगल डॉक, सेंड स्पेस, रॅपीड शेअर सारख्या 200 बेबसाईट बंद करण्यात आल्या. प्रामुख्याने या वेबसाईटवर कुणीतरी पोर्नोग्राफी, पायरेटेड चित्रपट अपलोड केल्यामुळे कोर्टाने बंदी घातली. मात्र या वेबसाईट केवळ फाईल शेअरींग, ट्रान्सफरसाठी वापरल्या जातात.

मोठी बातमी - मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता महापालिकेचा मोठा निर्णय, युद्धपातळीवर सुरु केलंय काम....

या वेबसाईट बंद झाल्याने हजारो ग्राहकांना फाईल पाठवण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे केवळ कुणीतरी चुकीच्या फाईल शेअर केल्यामुळे संपर्ण बेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.

therefore popular file sharing website we transfer banned in india


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: therefore popular file sharing website we transfer banned in india