esakal | तुमच्या फोनवर इंटरनेट स्पीड किती आहे? हे ॲप्स वापरुन करा चेक
sakal

बोलून बातमी शोधा

these apps are the best to check the internet speed on your phone

तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड जाणून घ्या; 'हे' आहेत बेस्ट ॲप्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या हाय स्पीड इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे, आपण काम करत असताना बऱ्याचदा अचानक तुमचे इंटरनेट स्लो होते, तुम्हाला देखील या समस्येचा सामना करावा लागत असेल, आज आपण काही मोबाईल applications बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट स्पीड काय आहे हे तपासू शकता.

Ookla स्पीड टेस्ट : Ookla हे सॉफ्टवेअर Apple स्टोअर वर देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकता. तुमच्या डिव्हाईसवर ॲप व्यवस्थित चालण्यासाठी तुम्हाला लोकेशन आणि इतर परवानग्यांची द्याव्या लागतात. वापरकर्ते त्यांची डेस्कटॉप ब्राउझर व्हर्जन देखील वापरू शकतात.

स्पीडटेस्ट मास्टर : Android डिव्हाइसवर इंटरनेट स्पीड टेस्ट करण्यासाठी स्पीडटेस्ट मास्टर हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. 4G, DSL, 5G आणि ADSL सारख्या विविध नेटवर्कच्या स्पीडची टेस्ट याच्या मदतीने घेता येते.

Meteor : हे जाहिरात फ्री इंटरनेट स्पीड टेस्ट टूल आहे, याच्या मदतीने मोबाईलमध्ये इंटरनेट स्पीड टेस्ट करता येते. नेटवर्क कनेक्शन जसे की 3G, 4G किंवा लेटेस्ट 5G ची देखील स्पीड याच्या मदतीने चेक करता येईल. हे अॅप वापरताना तुम्ही एखादे विशिष्ट ॲप कसे परफॉर्म करत आहे ते देखील तपासू शकता.

हेही वाचा: अगदी कमी किमतीत खरेदी करा 7 सीटर कार, 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन

Internet Speed Test Meter : हे ॲप्लिकेशन तुम्हाला मोबाईलमध्ये वायफायची डाउनलोड किंवा अपलोड करण्याची स्पीड काय आहे ते दाखवते. तुम्हा गरजेनुसार यामध्ये डार्क आणि लाईट मोड देखील स्विच करु शकता. तसेच ज्या वापरकर्त्यांकडे कमी स्टोरेज असलेले डिव्हाईस आहेत, ते 3Mb पेक्षा कमी असलेल्या स्पीडटेस्ट मास्टर लाइटचा वापर करून इंटरनेटची स्पीड तपासू शकतात.

गुगल स्पीड टेस्ट : जर तुम्हाला यापैकी कोणतेही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे नसेल तर हे ॲप तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. क्रोम उघडा आणि Google स्पीड टेस्ट शोधा. याच्या मदतीने तुम्ही युडर अपलोड आणि डाऊनलोड स्पीड तसेच कनेक्शन टाईम देखील तपासू शकता.

हेही वाचा: स्वस्त झाला Micromax IN Note 1, काय आहे नवीन किंमत?

loading image
go to top