तुमचा स्मार्टफोन चोरी झालाय, हे सरकारी पोर्टल करेल शोधण्यात मदत

Smartphone
SmartphoneGoogle

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन वापरत असतो. प्रत्येकाच्या खीशात 1000 रुपयांपासून ते 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीचे स्मार्टफोन्स असतात. अशा परिस्थितीत महागड्या स्मार्टफोनची चोरी होण्याच्या घटना देखील सर्रास होतात. स्मार्टफोन चोरीमुळे एखाद्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतेच सोबतच स्मार्टफोन वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटाही चोरीला जातो, ज्यामुळे लोकांची प्रायव्हसी व सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे बँकिंग फ्रॉडसह अनेक गुन्हेगारी घटना घडू शकतात. हे टाळण्यासाठी चोरी केलेला फोन त्वरित ब्लॉक केला पाहिजे. आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (this government portal will help finding stolen smartphone)

मोबाइल फोन कसा ब्लॉक करावा

  • जर मोबाइल फोन चोरीला गेला असेल तर आपण प्रथम पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविली पाहिजे. मोबाईल चोरीचा अहवाल ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीनेही दाखल केला जाऊ शकतो. तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारदाराने एफआयआर व तक्रार क्रमांकाची प्रत घ्यावी.

  • यानंतर, सेंट्रल इक्विपमेंट आईडेंटिटी रजिस्टर (CEIR) ची वेबसाईट ceir.gov.in वर जा. सीईआयआरकडे फोन मॉडेल, सिम आणि आयएमईआय नंबर सारख्या देशातील प्रत्येक मोबाइल फोनचा डेटा आहे, ज्याच्या मदतीने चोरीचा मोबाइल शोधला जातो. तसेच, मोबाइल ब्लॉक आणि अनलॉक केला जाऊ शकतो.

  • ceir.gov.in वर क्लिक केल्यावर तुम्हाला Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile असे तीन पर्याय दिसतील. यानंतर, Stolen/Lost Mobile या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर एक पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्याला आपल्या मोबाइलचा तपशील भरावा लागेल.

  • मोबाईल डिटेल्समध्ये मोबाईल नंबर, आयएमईआय नंबर, डिव्हाइस ब्रँड, कंपनी, फोन खरेदी करण्यासाठीचा इनव्हॉइस, हरवलेल्या फोनची तारीख रेकॉर्ड करावी लागेल. याशिवाय मोबाईल डिटेल्स म्हणून राज्य, जिल्हा, फोन चोरीचे क्षेत्र आणि तक्रार द्यावा लागेल. याशिवाय पोलिसांच्या तक्रारीची प्रत अपलोड करावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर ते अपलोड करावे लागेल.

  • यानंतर Add more complaint वर क्लिक करा, ज्यामध्ये मोबाइल मालकाचे नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळखपत्र द्यावी लागेल. यानंतर आपला मोबाइल नंबर द्यावा लागेल.

  • त्यानंतर आपल्या नंबरवर एक ओटीपी जाईल. यानंतर व्हेरिफीकेशन प्रक्रिया पूर्ण होईल. अशा प्रकारे, फायनल सबमिट करून मोबाइल फोन ब्लॉक केला जाऊ शकतो. तसेच, जर आपल्यास फोनबद्दल काही माहिती मिळाली तर ती वापरकर्त्यांना देखील पाठविली जाईल.

(this government portal will help finding stolen smartphone)

Smartphone
Airtel alert! ५.५ कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com