भारतीयांनी TikTok या चीनी ऍपला दिला दणका; रेटिंग 4.6 वरुन 2 वर

TikTok, App, China App
TikTok, App, China App

मुंबई :  टिकटॉक हे देशातील सर्वाधिक गतीने वाढणारे  ऍप आहे. मात्र, सध्या टिकटॉक  ऍपला अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण टिकटॉकची रेटिंग आठवड्याभराच्या काळात 4.6 वरुन 2 वर आली आहे. गुगल प्ले स्टोअर आणि  Apple ऍप्स स्टोअरवर अनेक युजर्संनी टिकटॉकसंदर्भात रिव्हिव देताना केवळ 1 स्टार रेटिंग दिले आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर यू-टू्यूब विरुद्ध टिकटॉक यावरुन सुरु झालेला वाद चांगलाच गाजत असल्याचं दिसत आहे.

प्रख्यात यू-ट्यूबर कॅरी मिनाटी(मुळ नाव- अजर नायर) याने 'YouTubevsTikTok: The End' या यू-ट्यूबवर शेअर केलेल्या व्हीडिओमुळे हा सर्व वाद सुरु झाला. या व्हिडिओत अजयने यु-ट्यूब आणि टिकटॉक यांच्यातील फरक सांगत टिकटॉक स्टार आमिर सिद्धीकी याची खिल्ली उडवली होती. हा व्हिडिओ यू-ट्यूबवर अल्पावधितच ट्रेंडिंगमध्ये आला. 1 कोटी 70 लाख व्ह्युज या व्हिडिओला मिळाले होता. मात्र, ही खिल्ली आमिर सिद्धीकी आणि अन्य टिकटॉक स्टार्संना चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनीही टिकटॉक व्हिडिओद्ववारे यू-ट्यूबविरोधात मोर्चा काढला. त्यांनतर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कारण देत यू-ट्यूबने कॅरी मिनाटीचा व्हिडिओ यू-ट्यूबवरुन हटवला. त्यानंतर या वादाने वेगळेच वळण घेतले.  यू-ट्यूब आणि टिकटॉक यांच्या समर्थकांमध्ये वादावादी सुरु झाली. 

कॅरी मिनाटीच्या समर्थनासाठी सोशल मीडियात अनेकजण पुढे आले. 'हिंदुस्तानी भाईजान' या टिकटॉक स्टारने तर कॅरीच्या समर्थनात 15 लाख फॉलोवर्सचे आपले टिकटॉक अकाऊंट डिलिट केले. याचे अनुकरण करत अनेकांनी मोबाईलमधील टिकटॉक  ऍप डिलिट केले. शिवाय चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याच्या उद्देशानेही अनेकांनी आपल्या मोबाईलमधील टिकटॉक ऍप डिलिट केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये टिकटॉक  ऍपची रेटिंग घसरुन 2 वर आली आहे. 
टिकटॉकवर व्यक्त होण्यासाठी अवघ्या 15 सेकंदाचा वेळ असल्याने अनेकदा येथे दर्जाविरहीत व्हिडिओ पोस्ट होत असतात. शिवाय अनेक टिकटॉक युजर्सकडून महिलांवर  ऍसिड हल्ला, बलात्कार यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात असल्याची तक्रार महिला आयोगाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सध्या टीकटॉक विरोधात वातावरण चांगलेच तापल्याचं दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com