xAI : इलॉन मस्कची मोठी घोषणा! उद्या लॉन्च होणार कंपनीचं पहिलं 'AI'

आर्टिफिशिअल इटेलिजन्स अर्थात AI मुळं अवघ्या जगात मोठी तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होण्याच्या मार्गावर आहे.
Elon Musk X
Elon Musk XSakal

XAI : आर्टिफिशिअल इटेलिजन्स अर्थात AI मुळं अवघ्या जगात मोठी तंत्रज्ञानावर आधारित क्रांती होण्याच्या मार्गावर आहे. सर्वत्र सध्या याच तंत्रज्ञानाची चर्चा आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि अॅप देखील आपलं स्वतंत्र एआय प्रोग्राम लॉन्च करत आहेत.

त्यातच आता सोशल मीडियातील बडी कंपनी असलेल्या एक्सचा (ट्विटर) मालक इलॉन मस्कनं पहिल्या आर्टिफिशिअल इटेलिजन्स कंपनीच्या पहिल्या एआय प्रोग्रामची घोषणा केली आहे. उद्या हे एआय लॉन्च होणार आहे.

AI बाबत मस्कचा मोठा दावा

इलॉन मस्कनं एक्सवर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. यामध्ये त्यानं म्हटलं की, उद्या विशिष्ट गटासाठी एक्सएआय लॉन्च होईल. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या एआय प्रोग्रामपैकी हे सर्वोत्तम एआय असेल असा दावाही मस्कनं आपल्या पोस्टमधून केला आहे. (Latest Marathi News)

Elon Musk X
Elvish Yadav: एल्विश यादवचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो सुषमा अंधारेंनी केला शेअर; म्हणाल्या, ड्रग्ज संबंधी...

उद्या होणार लॉन्च

बिलेनिअर इलॉन मस्क यांची xAI ही आर्टिफिशिअल कंपनी उद्या आपलं पहिलं AI प्रोग्राम लॉन्च करणार आहे. पण हा प्रोग्राम मर्यादित क्षमतेत लॉन्च होणार आहे. याच वर्षी जुलै महिन्यात मस्कनं आपलं एआय स्टार्टअप सुरु केलं होतं. याला त्यानं मानवतेसाठी काम करणारं स्टार्टअप असं म्हटलं होतं. या स्टार्टअप अर्थात कंपनीला मस्कनं xAI असं नावही दिलं होतं. (Latest Marathi News)

Elon Musk X
Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेल्या डेडलाईनमुळं संभ्रम? उदय सामंत म्हणाले...

भविष्य अंधकारमय असेल

कंपनी स्थापनेवेळी मस्कनं म्हटलं होतं की, आम्ही आता याद्वारे गरजेचं एआय तयार करण्यावर भर देणार आहोत. गार्डियनच्या वृत्तानुसार, त्यांनी म्हटलं होतं की, एआयच्या उदयामुळं भरपूर गोष्टी आवाक्यात येतील. वस्तू आणि सेवांचा तुटवडा भासणार नाही, पण भविष्य अंधकारमय होण्याचीही शक्यता आहे, असंही इलॉन मस्कनं म्हटलं होतं. (Latest Marathi News)

Elon Musk X
Ravindra Waikar: शिवसेना आमदार रविंद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या; ED कडून केस दाखल

अंदाजापेक्षाही वेगवान

यावेळी मस्कनं टर्मिनेटर चित्रपटाचाही संदर्भ दिला होता. एआयवर चालणाऱ्या रोबोट्सनं नष्ट केलेल्या भविष्याबद्दलच्या गोष्टींचा संदर्भही दिला. मस्कनं म्हणालं की, "टर्मिनेटर भविष्य टाळण्यासाठी टर्मिनेटर भविष्याबद्दल काळजी करणं आपल्यासाठी खरोखर महत्वाचं आहे. पाच किंवा सहा वर्षात सुपरइंटिलिजन्स तंत्रज्ञानही येऊ शकतं, अनेक तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा ते वेगवान असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com