
Toyota Hilux Price Cut : कमी झाली टोयोटा हिलक्सची किंमत! संपूर्ण माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
टोयोटा किर्लोस्कर मोटरने अलीकडेच जवळपास वर्षभराच्या अंतरानंतर हिलक्स पिक-अप ट्रकसाठी ऑर्डर स्वीकारणे पुन्हा सुरू केले. कंपनीने या वाहनाच्या किमतीतही बदल केला आहे. टोयोटा हिलक्सच्या बेस व्हेरियंटच्या किंमतीत 3.60 लाख रुपयांची कपात झाली आहे, तर टॉप-एंड व्हेरियंटमध्ये 1.35 लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
2023 Toyota Hilux तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. बेस-स्पेक स्टँडर्ड एमटी व्हेरियंटच्या किमतीत 3.60 लाख रुपयांची मोठी कपात झाली आहे, तर हाय एमटी आणि हाय एटी व्हेरियंटच्या किमती अनुक्रमे 1.35 लाख आणि 1.10 लाख रुपयांनी वाढल्या आहेत. 2023 Toyota Hilux ची किंमत आता 30.40 लाख रुपये ते 37.90 लाख रुपये आहे.
टोयोटा हिलक्स: इंजिन आणि गिअरबॉक्स
टोयोटा हिलक्स 2.8-लिटर चार-सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आले आहे जे मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 201 bhp आणि 420 Nm टॉर्क निर्माण करते परंतु ऑटोमॅटीक व्हेरिएंटमध्ये 500 Nm पीक टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT द्वारे ऑपरेट केले जाते, जे सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड फिटमेंट म्हणून 4X4 सह येते.

जुन्या आणि नव्या किमती
टोयोटा हिलक्स: फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत, हायलक्समध्ये ऑल-एलईडी हेडलॅम्प, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सहा स्पीकर, पुश बटण स्टार्ट स्टॉप, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स दिली आहेत.
टोयोटा हिलक्स सेफ्टी फीचर्स
टोयोटा हिलक्समध्ये मिळणाऱ्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, सात एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, व्हेहिकल स्टेबिलीटी कंट्रोल आणि हिल असिस्ट, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्सिंग कॅमेरा यांसारखी फीचर्स जोडण्यात आली आहेत. टोयोटा हिलक्सवर 3 वर्षे किंवा 1,00,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी देत आहे.
टोयोटा हिलक्स भारतातील पिकअप सेगमेंटमध्ये इसुझू डी-मॅक्स व्ही-क्रॉस, टोयोटा फॉर्च्युनर आणि एमजी ग्लोस्टरशी स्पर्धा करते.